‘बीएसएनएल’ची 1 मार्चपासून 4-जी सेवा सादर ?
कंपनीची 2017 रोजी प्रथम 4-जी सेवेची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यांच्याकडून 1 मार्चपासून 4-जी सेवा सादर करण्याची शक्यता आहे. यासाठी कंपनीने दूरसंचार विभागाकडे पत्र लिहून 1 मार्चपासून 4-जी सेवा सुरु करण्यासाठी स्पेक्ट्रम रिलीज करण्यासाठी सांगितले आहे. कंपनीने 2017 मध्ये प्रथम 4-जी स्पेक्ट्रमची मागणी केली होती. परंतु त्यांची आतापर्यंत उपलब्धी करुन दिली नाही.
बिझनेस लाईनच्या माहितीनुसार कंपनीकडून 4-जी सेवा सादरीकरण करताना योजनेची पडताळणी करण्याची गरज असल्याची माहिती दिली आहे. कारण कंपनीला नवीन सुविधा सादर करताना या गोष्टीचा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
कर्मचाऱयांचा वेतन प्रश्न
कर्जाच्या ओझ्याखाली वावरत असणारी बीएसएनएल पुढील आठवडय़ात आपल्या कर्मचाऱयांचे डिसेंबरमधील वेतन देण्याची तयारी करत आहे. कंपनीने आपले 3000 कोटी रुपयाचे कर्जामधून वेंडर आणि क्लीनर पेमेंट देण्यास सुरुवात केली आहे.
एमटीएनएलकडेही 4-जी स्पेक्ट्रम नाही
बीएसएनएल आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड(एमटीएनएल) यांच्याजवळ 4-जी स्पेक्ट्रम नाही. परंतु बीएसएनएल काही क्षेत्रात हाय ऍण्ड बेस ट्रान्सीवर स्टेशन्स (बीटीएस) चा वापर करुन 4-जी सेवा प्राप्त करत आहे. ही सेवा 3-जी स्पेक्ट्रमच्या आधारे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.