बीएमडब्लूची नवी एक्स 4 भारतीय बाजारात दाखल
पेट्रोल व डिझेल या मॉडेलमध्ये उपलब्ध होणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिग्गज जर्मनीतील लक्झरी कार निर्मिती कंपनी बीएमडब्लू यांच्याकडून एसयूव्ही कूप एक्स 4 या मॉडेलला नव्याने भारतीय बाजारात सादर करण्यात आले आहे. या कारची किमत 70.5 लाख रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. पेट्रोल इंजिनवर असणाऱया या मॉडेलची किमत ही 70.5 लाख रुपये आणि डिझेल मॉडेल कारची किमत 72.5 लाख रुपये ठेवण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
कूपच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले असून काही निवड बदलासह उपकरणासोबत अन्य गोष्टींवर विचार करण्यात आला आहे. या कारची निर्मिती चेन्नई येथे असणाऱया प्रकल्पामध्ये घेतले जाते. सदरची गाडी देशभरात बीएमडब्लूच्या डिलर्सकडे उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
नव्या लूकसह अधिकचे फिचर्स
आम्ही नव्या लूकसह विविध तंत्रज्ञानाशी संबंधीत बदल केले असून नवीन एक्स4 हे मॉडेल ग्राहकांसाठी बाजारात आणले असल्याचे बीएमडब्लू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह यांनी सांगितले आहे.