बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे विविध उपक्रम
प्रतिनिधी/ सातारा
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने व शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्ताने तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या अनुषंगाने शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव इंगवले, नंदकुमार फडके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पालिका शाळेतील होतकरु विद्यार्थीनीना सायकल वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांगा बांधवांना मोफत चादर वाटप करण्यात आले. तसेच विविध उपक्रम राबवण्यात आले.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेली चार वर्ष शिवप्रेरणा प्रतिष्ठान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी विविध उपक्रमांमध्ये जयंती पार पडली. त्यामध्ये पालिका शाळेंच्या मुलींना सायकल वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांना चादर वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. शाहु बोर्डिंगमधील मुलांना मिष्टान्न वाटप करण्यात आले. ऐहसास संस्थेतील विद्यार्थ्यांना चादर वाटप करण्यात आले. यशोधन ट्रस्टमध्ये चादर व ब्लँकेट वाटप करण्यात आले. कातकरी समाज बांधवांना चादर वाटप करण्यात आले. यावेळी गोलबाग मित्र समुहाचे अध्यक्ष दीपक शिंदे, नंदकुमार फडके, प्रशांत थोरात, भाऊ माळी, धनंजय जाधव, अजित भिलारे, शिवसेनेचे शहर संघटक प्रणव सावंत, उपशहर प्रमुख सागर धोत्रे, विभाग प्रमुख सुनील भोसले, प्रतिष्ठानचे सदस्य दीपक पाटील। अॅङ विनोद निकम, शांताराम भणगे, मनोज निंबाळकर, निलेश शिंदे, कुमार पोतदार, विनायक शिंदे, विशाल भोसले, शिवाजी पवार, आशितोष पारंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगवले यांनी केले. प्रास्ताविक शहरप्रमुख व अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केले. दीपक पाटील यांनी आभार मानले.