बाजारात सप्ताहाचा शेवट तेजीच्या माहोलाने
वृत्तसंस्था / मुंबई :
शेअर बाजार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पुन्हा तेजीच्या वातावरणाने समाप्त झाला
आहे. चालू आठवडय़ात शेअर बाजार फक्त तीन दिवसच सुरु राहिला. सोमवारी महावीर जयंतीची
सुटी होती आणि शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने
बाजाराला सुट्टी राहणार आहे. त्यामुळे बाजाराचा आठवडा गुरुवारीच समाप्त झाला.
बुधवारी मोठय़ा घसरणीची नोंद केल्यानंतर पुन्हा दुसऱया दिवशी
सेन्सेक्स आणि निफ्टी वधारल्याचे दिसून आले. दिवसभराच्या कामगिरीनंतर बंद होताना सेन्सेक्स
1265.66 अंकांनी वधारुन निर्देशांक 31,159.62 वर बंद झाला आहे. दुसरीकडे निफ्टी
363.15 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,111.90 वर बंद झाला आहे.
प्रमुख क्षेत्रापैकी वाहन क्षेत्राचे समभाग 17 टक्क्मयांनी वधारले
आहेत. दिग्गज कंपन्यांपैकी टाटा मोटर्स 10.36, मारुती सुझुकी 13.65, हिरो मोटोकॉर्प
9.65, मदरसन सुमी सिस्टम 17.54, अपोलो टायर्स 7.61, बजाज ऑटो 8.86, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा
16.74 कमिन्स इंडिया 7.17 टक्क्मयांनी वधारले आहेत.
रशियाकडून तेल उत्पादनात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर कच्च्या
तेलाच्या किमतीत गुरुवारी तेजी झाल्याचे दिसून आले. पुढे रशियाने म्हटले आहे, की ऊर्जा
बाजारात तेजी आणण्यासाठी प्रमुख उत्पादक देशांनी बैठकीच्या अगोदर उत्पादनात कपात करण्याची
तयारी दाखविण्यात आली आहे.
याच दरम्यान अमेरिकन मानांकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 4.6 टक्क्मयांनी
वाढून 26.26 डॉलर प्रति बॅरेल झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय ब्रेंट प्रुड 2.7 टक्क्मयांनी
वधारुन 33.73 डॉलरवर पोहोचला आहे. याच्या सकारात्मक परिणामामुळे अमेरिकन शेअर बाजारात तेजी सोबत आशियाई शेअर बाजारांचा कल सकारात्मक
राहिल्याचे दिसून आले. यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजीचा माहोल राहिला.