महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशसमोर आज नेपाळचा धोका

06:43 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ किंग्सटाउन

Advertisement

बांगलादेश आज सोमवारी येथे होणार असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात अवघड नेपाळशी सामना करताना त्यांच्या त्रुटी दूर करण्याचा आणि गट ‘ड’मधून सुपर एटमधील दुसरे स्थान मिळविण्याचा प्रयत्न करेल. चार गुणांसह बांगलादेश स्पर्धेतील शेवटच्या गटातून पुढे जाण्यास सज्ज असला, तरी उत्साही नेपाळपासून त्यांना धोका असेल.

Advertisement

जरी नेपाळने अद्याप एकही सामना जिंकला नसला आणि पुढच्या फेरीच्या शर्यतीतून तो संघ बाहेर पडला असला, तरी दक्षिण आफ्रिकेविऊद्ध जवळजवळ विजय खेचण्याच्या जवळ पोहोचल्याने नेपाळचा आत्मविश्वास उंचावला आहे. विश्वचषकातील मोहीम संपुष्टात आणण्यापूर्वी कसोटी खेळणाऱ्या राष्ट्राला हरवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यास ते उत्सुक असतील. मात्र जर नेपाळकडून बांगलादेश मोठ्या फरकाने हरला आणि नेदरलँड्सने संघर्ष करणाऱ्या श्रीलंकेविऊद्धही त्याचाच कित्ता गिरविला, तर बांगलादेशसाठी समीकरण बदलू शकते.

सामन्याची वेळ : पहाटे 5 वा. (भारतीय वेळेनुसार)

श्रीलंकेचा आज नेदरलँड्सशी सामना

ग्रॉस आयलेट (सेंट लुसिया) : डच आक्रमण आणि सध्याचा फॉर्म हा ज्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे तो 2014 चा विजेता श्रीलंका संघ गट ‘ड’मध्ये पाचव्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्सशी आज लढेल. आधीच सुपर एट फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या श्रीलंकेची प्रतिष्ठा आज हरल्यास आणखी धोक्यात येईल. कारण त्यांच्यासाठी ही स्पर्धा विस्मरणीय राहिलेली असून मैदानावर आणि बाहेर अनेक समस्यांनी त्यांना ग्रासले आहे. त्यामुळे स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील नेदरलँड्स संघाला त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळेल आणि मोठ्या विजयाची आशा ते बाळगून असतील. नेदरलँड्सने या स्पर्धेतील तीनपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तरीही ते जवळजवळ बाहेर पडल्यात जमा असून दक्षिण आफ्रिकेने या गटातून आधीच पुढील फेरी गाठली आहे.

सामन्याची वेळ : सकाळी 6 वा.

न्यूझीलंड दिलासादायक विजयाच्या शोधात

तारौबा : न्यूझीलंडच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील मोहिमेवर आज अकाली पडदा पडणार असला, तरी तळाकडच्या पापुआ न्यू गिनीवर ते दिलासादायक विजय मिळवू पाहतील. आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या किवींना सुऊवातीला सुस्त राहण्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. सुरुवातीच्या काही पराभवांमुळे त्यांना धक्कादायक पद्धतीने लवकर बाहेर पडावे लागले आहे.  तथापि, किवींसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. कारण ट्रेंट बोल्टने हा त्याचा शेवटचा टी-20 विश्वचषक आहे याला पुष्टी दिलेली आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघ विजय मिळवून स्पर्धेतील मोहिमेची समाप्ती करू पाहील. पापुआ न्यू गिनीने आतापर्यंतचे त्यांचे तिन्ही सामने गमावले आहेत.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article