For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीच्या घराची जाळपोळ

06:06 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बलात्कार हत्या प्रकरणातील  आरोपीच्या घराची जाळपोळ
Advertisement

राजस्थानातील दौसामध्ये तणाव : कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पोलिसांवरही हल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ दौसा

गर्भवती महिलेवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीचे घर जाळण्याचा प्रकार राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात घडला आहे. संतप्त गावकऱ्यांनी आरोपींच्या नातेवाईकांच्या घरांचीही तोडफोड केली. हल्ला करण्यापूर्वी गावकऱ्यांनी बैठक घेऊन हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्यांनी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही दगडफेक केली. ही घटना दौसा येथील मेहंदीपूर बालाजी येथील नांद्री गावात गुऊवारी रात्री उशिराने घडली. या संपूर्ण घटनेनंतर नांद्री परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Advertisement

दौसा जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपींवर गुरुवारी रात्री लोकांनी हल्ला केला. यावेळी आरोपींसह त्यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरांना आग लावण्यात आली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता लोक पोलिसांवरही संतापले. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतर अनेक पोलीस ठाण्यांच्या पोलिसांना घटनास्थळी पाचारण केल्यानंतर वातावरण शांत करण्यात आले.

बलात्कार आणि हत्येची घटना जिह्यातील मेहंदीपूर बालाजी पोलीस स्टेशन हद्दीतील नांद्री गावात घडली आहे. गावातील एका तऊणाने 28 एप्रिल रोजी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता सोमवारी महिलेचा मृतदेह डोंगराच्या मागे शेतातील जंगलात आढळून आला. बलात्कारानंतर महिलेची हत्या केल्याचा आरोप पतीने केला आहे. सदर पीडित  महिला सहा महिन्यांची गरोदर असताना हा प्रकार घडल्याने गावात संतापाचे वातावरण आहे. आगीच्या घटनेनंतर आरोपीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घर सोडून पळ काढला. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. ज्या घरांना आग लागली त्या घरांभोवतीही पोलीस तैनात आहेत.

Advertisement
Tags :

.