महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बँकांवरील बुडीत कर्जाचा भार घटतोय

06:15 AM Dec 30, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रॉस एनपीएमध्ये घसरणीमुळे दिलासा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

कोरोना महामारीमुळे देशासोबत लोकांची आर्थिक स्थिती बिघडली असली तरीही बँकांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. देशात बँकांची कर्जे आता कमी प्रमाणात बुडू लागली ओत. बँकांचा ग्रॉस एनपीए अलिकडच्या काळात सातत्याने कमी झाला आहे. रिझव्हं बँकेच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

रिझर्व्ह बँकेने 2020-21 आर्थिक वर्षासाठी अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार ग्रॉस एनपीएचे प्रमाण सातत्याने कमी झाले आहे. हे प्रमाण 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस मार्च 2020 मध्ये 8.2 टक्के होत. हाच आकडा मार्च 2021 मध्ये कमी होत 7.3 टक्क्यांवर आला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत आणखी कमी होत हा आकडा 6.9 टक्के झाला आहे. बँकांच्या ग्रॉस एनपीएत 2018 नंतर सातत्याने घट होत आहे. हे प्रमाण आता 6 वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले आहे.

नफा कमविण्याच्या क्षमतेत सुधार

आरबीआयच्या ‘रिपोर्ट ऑन ट्रेंड अँड प्रोगेस ऑफ बँकिंग इन इंडिया’मध्ये 2020-21 कालावधीत शेडय़ुल्ड कमर्शियल बँकांची आर्थिक कामगिरीही सुधारल्याचे नमूद आहे. परंतु याचे कारण उत्पन्न वाढणे नसून खर्च कमी होणे आहे. यादरम्यान बँकांसाठी उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत व्याजरुपी उत्पन्नात किरकोळ घट झाली आहे. याची भरपाई गुंतवणुकीतून मिळालेला परतावा आणि सरकारी रोख्यांमधून झालेल्या नफ्याने केली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षादरम्यान बँकांची नफा कमाविण्याची क्षमता काहीशी वाढली आहे. यापूर्वीच्या 5 वर्षांमध्ये या क्षमतेत घट होत होती.

ताळेबंदाचा आकार वाढला

अहवालानुसार 2020-21 मध्ये बँकांच्या बॅलन्सशीटचा आकारही वाढला आहे. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाही बँकांचा ताळेबंद वाढल्याने  ही कामगिरी विशेष ठरते. क्रेडिटच्या ग्रोथ रेटमध्ये सुधारणेचा क्रम कायम आहे. ठेवींच्या ग्रोथ रेटमध्ये मात्र काहीशी घट झाली आहे. वर्षभरापूर्वी ठेवी 11 टक्क्यांच्या दराने वाढत होत्या. सप्टेंबरमध्ये हा दर 10.1 टक्क्यांवर आला आहे.

एनबीएफसी, सहकारी बँकांमध्येही सुधार

सहकारी बँकांप्रकरणी देखील या अहवालात सकारात्मक बाबी समोर आल्या आहेत. राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नफा कमाविण्याची क्षमता 2019-20 मध्ये वाढली आहे. अशा बँकांची आर्थिक स्थिती बिघडली असली तरीही हे घडले आहे. एनबीएफसीचा ताळेबंद 2020-21 मध्ये वाढला आहे. तसेच त्यांची असेट क्वालिटी आणि कॅपिटल बफरमध्येही सुधारणा झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article