महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फेसबुकचा तिमाही नफा 7 टक्क्यांनी वाढला

12:20 AM Jan 31, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / कॅलिफोर्निया  :

Advertisement

सोशल मीडीया म्हणून सर्वत्र परिचीत असणाऱया फेसबुक कंपनीला ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत 7.34 अब्ज डॉलर (52,520 कोटी रुपये) इतका नफा झाला आहे. हा 2018 च्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी अधिक  झाला आहे. तेव्हा कंपनीने 6.88 अब्ज डॉलर (49,182 कोटी रुपये) इतक्या नफ्याची नोंद केली होती.

Advertisement

यावेळी कंपनीला 21.08 अब्ज डॉलर(1.50 लाख कोटी रुपये) इतकी महसूल कमाई झाली आहे. हाच आकडा 2018 मधील तिमाहीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक राहिला आहे. 2018 च्या समान तिमाहीत कंपनीला 16.91 अब्ज (1.20 लाख कोटी रुपये) इतका महसूल प्राप्त झाला होता. सलग चौथ्या तिमाहीत कंपनीची  महसूल वाढ 30 टक्क्यांनी कमी झाली आहे.

2019 मध्ये नफा 16 टक्क्यांनी घटला

फेसबुकने तिमाही अहवालासोबत वर्षभरातील कामगिरीची मांडणी केली आहे. 2019 मध्ये कंपनीला 18.48 अब्ज डॉलर(132 लाख कोटी रुपये) कमाई झाली आहे. तर 2018 च्या तुलनेत हा आकडा 16 टक्क्यांनी कमी राहिला आहे. 2018 मध्ये कंपनीला 22.11अब्ज डॉलरचा (1.58 लाख कोटी रुपये) नफा झाला होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीने 55 कोट डॉलर(3,930 कोटी रुपये) कायदेशीर खर्चासाठी शिल्लक ठेवले आहे.

 

Advertisement
Tags :
#BUSNESS#tarunbharatnews
Next Article