फूड डिलिव्हरी सेवाही ऍमेझॉन करणार बंद
२९ डिसेंबरपर्यंतच सेवा ः शिक्षण ऍकॅडमी केली बंद
वृत्तसंस्था / बेंगळूर
शिक्षणविषयक अकॅडमी बंद केल्यानंतर देशातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन आता फूड डिलिव्हरी व्यवसाय सेवा बंद करणार आहे. यासंबंधीचा निर्णय कंपनीने काही दिवसांपूर्वी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऍमेझॉनने काही दिवसांपूर्वी आपल्या रेस्टॉरंट भागीदारांना यासंदर्भात इमेलद्वारे सूचित केले असल्याचे समजते. माहितीनुसार 29 डिसेंबर नंतर फूड डिलिव्हरी सेवा बंद होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऍमेझॉनने फूड डिलिव्हरी सेवेला मे 2020 मध्ये सुरुवात केली होती परंतु आता कंपनीने या व्यवसायातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची सूचना आपले
रेस्टॉरंट भागीदार यांना ई-मेल करून कंपनीने सविस्तरपणे केली आहे. 29 डिसेंबरनंतर अमेझॉनच्या ग्राहकांना फूड डिलिव्हरीची सेवा नोंदवता येणार नाही आहे.
ऍमेझॉन ऍकॅडमी बंद
ऍमेझॉनने यापूर्वी शैक्षणिक क्षेत्रासाठी ऍमेझॉन अकॅडमी 2021 मध्ये सुरू केली होती. ती आता बंद करण्यात आली आहे. असं जरी असलं तरी बिझनेस ते बिजनेसअंतर्गत जी गुंतवणुकीची मोहीम सुरू ठेवली आहे ती तशीच राहणार आहे.