फिनटेक फंडिंगमध्ये भारताची झेप
चीनला पाठीमागे टाकण्यात भारत यशस्वी : 2019 मधील कामगिरीत भारत जगात तिसऱया स्थानावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2019 मध्ये फायनाशिअल टेक्नालॉजीमध्ये (फिनटेक) भारताने योग्य कामगिरी करत जागतिक पातळीवर तिसऱया क्रमांकावर झेपली असून भारत फिनटेकचे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. या कामगिरीत चीनलाही भारताने पाठीमागे टाकले आहे. चीन सध्या अमेरिका आणि ब्रिटनच्याही मागे पडला आहे. अशी माहिती डाटा ऍनालिस्ट फर्म एक्सेंचरच्या एका अहवालामधून देण्यात आली आहे.
सर्वाधिक गुंतवणूक
2019 मध्ये भारतातील फिनटेक केंद्रातून मिळणार फंड हा दुप्पट होत 3.7 कोटी डॉलरवर पोहोचला आहे. (26 हजार कोटी) 2018 मध्ये भारतीय फिनटेकला 1.9 कोटी डॉलरचा (13 हजार कोटी) फंड मिळालेला होता. उपलब्ध अहवालामधून 2018 रोजी 193 च्या तुलनेत 2019 मध्ये 198 आर्थिक सौदे झाले आहेत. भारातात मागील वर्षात सर्वाधिक 58 टक्के फंड स्टार्टअप्सला मिळाले आहेत. त्याच्यानंतरच इन्शुरन्स टेक्नालॉजी 13.7 टक्के फंड मिळाल्याचे अहवालामधून सांगितले आहे.
विविध प्रकारातील गुंतवणूक
2019 मध्ये वन 97 कम्युनिकेशनच्या मालकीचे असणारे डिजिटल वॉलेट पेटीएमने 1.66 कोटी डॉलर(11 हजार कोटी रुपये) जोडले आहेत. ही रक्कम दोन्ही वेगवेगळय़ा करारानुसार उभा करण्यात आली आहे. यासोबतच फोन-पे 210 दशलक्ष डॉलर (1500 कोटी रुपये) रोजर-पे ने जवळपास 500 कोटी, पॉलीसी बाजाराने 2000 कोटी आणि पेडिट कार्ड पेमेन्ट कंपनी क्रेडने 850 कोटी रुपये उभारले आहेत.
पेटीएमची बाजी
पेटीएम कंपनीने 2019 मध्ये फिनटेकमध्ये 2.1 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2018 मध्ये हा आकडा 660 दशलक्ष डॉलर म्हणजे 4700 कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. तसेच इन्शुरन्स टेक्नालॉजीमधील गुंतवणूक 74 टक्क्यांनी वाढली आहे. आणि या क्षेत्रामध्ये 510 दशलक्ष डॉलर म्हणजे 3600 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे एक्सेंचरच्या अनुमानातून यावेळी सांगितले आहे.