For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फातोर्ड्यात आज रंगणार एफसी गोवा-केरळ ब्लास्टर्स लढत

06:09 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
फातोर्ड्यात आज रंगणार एफसी गोवा केरळ ब्लास्टर्स लढत
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव

Advertisement

आएसएलच्या हंगामातील महत्वपूर्ण लीग लढतीत आज रविवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर एफसी गोवा आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यात लढत होणार आहे. दोन महिन्यांनंतर आयएसएल हंगामाने महत्वपूर्ण टप्प्यावर प्रवेश केला आहे. हा असा टप्पा आहे जिथे गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेल्या दोन्ही संघांचे टॅलेंट आणि टेम्परामेंट यांच्यात फारच कमी फरक आहे.

केरळ ब्लास्टर्सच्या गोवा ट्रीपने फुटबॉल चाहत्यांना फातोर्डा स्टेडियमवर एक सर्वोत्तम आणि ब्लॉकबस्टर सामना अपेक्षित आहे. मॅनोलो मार्क्वेज आणि इव्हान वुकोमानोविच या दोन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालील दोन्ही क्लबांनी आयएसएलच्या यंदाच्या हंगामात छाप पाडली आहे.

Advertisement

2021-22 हंगामातील अंतिम फेरीत हे दोन्ही प्रशिक्षका आमनेसामने आले होते. त्यावेळी मार्क्वेझने त्याच्या हैदराबाद एफसीसह वुकोमानोविचवर आघाडी मिळविली. 2014 मधील लीगच्या सुरूवातीपासून प्रथम केरळ ब्लागस्टर्स आयएसएल चषक मिळवण्याच्या अगदी समीप होते. आता सर्बियाच्या वुकोमानोविच यांनी आयएसएल विजेते तयार करण्यासाठी पुनर्बांधणी केली आहे. त्यामुळे हा सामना आतापर्यंत निर्माण केलेली ही अविश्वनीय गती टिकवून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.

या सीझनमध्ये त्यांचा एकमेव पराभव मुंबई सिटी एफसीविरूद्ध झाला. एफसी गोवाविरूद्ध असा कोणताही निकाल टाळण्याचा ते प्रयत्न करतील, कारण केरळ ब्लास्टर्सपेक्षा दोन सामने कमी खेळले असूनही एफसी गोवा त्यांच्या गुणतालिकेत केवळ एक गुण मागे आहेत.

एफसी गोवाचे प्रशिक्षक मार्क्वेझ यांना त्यांना अपेक्षित कामगिरी करण्याच्यादृष्टीने चांगले खेळाडू व सपोर्ट स्टाफ मिळाला आाहे. ओडेई ओनेंडिया, संदेशझिंगन, ब्रँडन फर्नांडिस, नोहा सदाओई यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंसह जय गुप्तासारख्या युवा खेळाडूंच्या बळावर एफसी गोवाने परिपूर्ण आएसएल संघ तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात सर्व आघड्यांवर वर्चस्व राखले आहे. केरळ ब्लास्टर्ससारख्या फॉर्मात असलेल्या संघाविरूद्ध सर्व आघड्यांवर सर्वोत्तम खेळाला त्यांचे प्राधान्य असेल.

एफसी गोवा प्रमाणेच केरळ ब्लास्टर्स एफसीकडे त्यांच्या गोल-स्कोअरिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक क्रिएटिव्ह स्ट्रायकर्सची खाण आहे. क्वामे पेप्राहृ अॅड्रियान लूना, दिमित्रिओस डायमँटाकोस, डॅनीश फारुख यांचा खेळ प्रत्येक साम्गन्यागणिक बहरत आहे तसेच प्रीतम् कोटालच्या समावेशामुळे केरळ ब्लास्टर्सची बचावफळी मजबूत झाली आहे.

Advertisement
Tags :

.