पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे आंतरराष्ट्रीय बाँड सूचीबद्ध
बाँडसाठी 2.2 अरब डॉलरची बोली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे (पीएफसी) 75 कोटी डॉलरचे आंतरराष्ट्रीय बाँड सोमवारी एनएसई, आयएफएसी गिफ्टी सिटीमध्ये सूचीबद्ध झाले. कंपनीचा हा एकमात्र सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय बाँड आहे. कंपनीचा हा सादर केलेला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय बाँड असून, सुमारे 75 कोटी डॉलरच्या या बाँडसाठी 2.2 अरब डॉलरची बोली मिळाली आहे. 10.25 वर्षाचा कालावधी असलेल्या बाँडवर व्याजदर 3.95 टक्के आहे, असे पीएफसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव शर्मा यांनी सांगितले.
भारतात आंतरराष्ट्रीय बाँडमुळे एक गतिमान आणि कार्यक्षम बाजाराच्या विकासाला चालना मिळेल. हा बाँड कालांतराने इंडिया आयएनएक्स आणि सिंगापूर शेअर बाजारातही सूचीबद्ध होईल. या बाँडला चारपटीने वर्गणीदार मिळाले असून, प्रत्येक क्षेत्रातून याला बोली मिळत आहे. एकूण बोलीमध्ये 42 टक्के वर्गणीदार अमेरिका बाजारातून तर 41 टक्के आशियाई बाजार तसेच 17 टक्के युरोपीय बाजारातून मिळाले आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
कठिण परिस्थितीतूनही चांगली कामगिरी
गेल्या वर्षी मार्चमध्ये पीएफसीने आरईसीचे अधिग्रहण केले होते. गुंतवणूकदार, कर्जदार आणि रेटिंग संस्थाकडून याच्या प्रतिकूल प्रभावावरून गंभीर चिंता व्यक्त केली होती. मात्र, कंपनीने कठिण परिस्थितीतून चांगल्या प्रदर्शनातून कामगिरी दाखविली. कंपनीने 2018-19 मध्ये 68 हजार कोटींचे कर्ज दिले होते. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पीएफसीचे सकल एनपीए 9.39 टक्क्यांवरून कमी होत 2018-19 मध्ये 9.05 टक्के होता. तर शुद्ध एनपीए 4.61 टक्क्यांवरून 4.28 टक्के झाला, असेही शर्मा यांनी सांगितले.