पेप्सिकोकडून 5 हजार कोटीमध्ये स्नॅक्स ब्रँडची खरेदी
वृत्तसंस्था/ बीजिंग
अमेरिकेची मल्टीनॅशनल फूड ऍण्ड वेबरेज कंपनी पेप्सिको इंक यांनी चीनची प्रमुख स्नॅक्स ब्रँड बी ऍण्ड चेरी या कंपनीची खरेदी केली आहे. बी ऍण्ड बेरी ब्रँडची मालकी हाउक्संगनी हेल्थ ऍण्ड फूड कंपनी लिमिटेड यांच्याकडे आहे. हा व्यवहार 705 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 5 हजार कोटी रुपयांमध्ये झाला आहे. अशी माहिती रॉयटर्सच्या अहवालतून देण्यात आली आहे.
पेप्सीला मोठी संधी
अमेरिकन पेप्सिकोने म्हटले आहे, की बी ऍण्ड चेरीचे अधिग्रहणामुळे त्याला चीनची मुख्य कंझ्युमर आधारीत फूड ऍण्ड बेवरेज कंपनी बनण्यास मोठी मदत मिळणार आहे. बी ऍण्ड चेरी नट्स आणि सुख्या फळांचे स्नॅक्स बनविण्याचा व्यवहार करु शकते. याचा लाभ उत्पादक चीनमधील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या आधारे विक्री होऊ शकते.
व्यापारला चालना
या अधिग्रहणामुळे कंपनीला चीनच्या ई-कॉमर्स क्षेत्रात विस्तार आणि आपला पोर्टफोलियो एक स्थानिक उत्पादन जोडण्यास मदत मिळणार असल्याचे पेप्सिकोचे ग्रेटर चायनामधील सीईओ राम कृष्णनन यांच्याकडून सांगण्यात आले आहे.