पियाजिओ ‘बीएस व्हीआय’चे सादरीकरण
प्रतिनिधी / पुणे
पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) या इटालियन पियाजिओ ग्रुपच्या तसेच भारतातील छोट्या वाणिज्यिक वाहनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने बीएसन्न्घ् श्रेणीतील सर्व उत्पादनांचे पुण्यात प्रदर्शन केले. डिझेल आणि पर्यायी इंधन श्रेणीतील ‘दि परफॉर्मन्स रेंज’ या नावाने ओळखली जाणारी ही संपूर्ण श्रेणी प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
डिझेल रेंजमध्ये नवीन शक्तिशाली 599 सीसी इंजिन असून, त्यातून 7 किलोवॅट शक्ती आणि 23.5 एनएम टॉर्क मिळतो. हे इंजिन 5-स्पीड गिअर बॉक्स आणि नवीन ऍल्युमिनियम क्लचसह असून, ते भार वाहून नेण्याची क्षमता मोठय़ा प्रमाणावर वाढवून ट्रिपचा वेळ कमी करते. या कंपनीने बीएस न्न्घ् उत्पादनांच्या किमतींचीही घोषणा केली असून, डिझेल रेंजची एक्स शोरूम किंमत 45,000 रूपयांनी जास्त आहे आणि पर्यायी इंधन श्रेणीची किंमत इतर समकक्ष बीएस न्न्घ् उत्पादनांच्या तुलनेत 15,000 रूपयांनी जास्त आहे. 36 महिन्यांची वॉरंटी आणि खास सुपर सेव्हर मेन्टेनन्स स्कीम यात आहे.