For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिला डोस घेणाऱयांची संख्या 1.10 लाख

05:00 AM May 12, 2021 IST | Abhijeet Khandekar
पहिला डोस घेणाऱयांची संख्या 1 10 लाख
Advertisement

30 हजारजणांनी घेतला दुसरा डोस : डॉ. महेश खलिपे, डॉ. संदेश कांबळी यांनी दिली माहिती

Advertisement

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 1 लाख 10 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 30 हजार 235 जणांनी दुसरा डोस घेतला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Advertisement

जिल्हय़ात आतापर्यंत 1 लाख 10 हजार 291 जणांनी पहिला डोस घेतला.  यामध्ये एकूण 9 हजार 435 हेल्थ वर्करनी पहिला डोस, तर 6 हजार 439 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 417 प्रंटलाईन वर्करनी पहिला डोस, तर 3 हजार 796 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षांवरील 48 हजार 259 व्यक्तींनी पहिला डोस, तर 16 हजार 582 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षांवरील 32 हजार 728 नागरिकांनी पहिला डोस, तर 3 हजार 418 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 40 हजार 526 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्हय़ाला आजपर्यंत एकूण 1 लाख 59 हजार 696 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 22 हजार 480 लसी या कोव्हिशिल्डच्या, तर 36 हजार 450 लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 5 हजार 263 कोव्हिशिल्ड आणि 35 हजार 263 कोव्हॅक्सिन असे मिळून 1 लाख 40 हजार 526 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्हय़ातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 13 हजार 170 लसी असून त्यापैकी 12 हजार 950 कोव्हिशिल्डच्या, तर 220 कोव्हॅक्सिनच्या आहेत. जिल्हय़ात सध्या 5 हजार 940 लसी स्टोअरमध्ये असून 5 हजार 900 कोव्हिशिल्डच्या आणि 40 कोव्हॅक्सिनच्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :

.