For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी शनिवारी पुन्हा राज्यात

06:10 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी शनिवारी पुन्हा राज्यात
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

गेल्या रविवारीच राज्यात येऊन म्हैसूर आणि बेंगळूरमध्ये जोरदार प्रचार केलेले  पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 एप्रिल रोजी पुन्हा निवडणूक प्रचारासाठी राज्यात येत आहेत. दरम्यान, त्यांनी चिक्कबळ्ळापूर आणि बेंगळूर येथील जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. राज्यात निवडणुकीला रंग चढला असून पंतप्रधान मोदीही राज्यात भाजप समर्थक प्रचारात सक्रिय झाले आहेत. 20 रोजी चिक्कबळ्ळापूर येथे दुपारी 4 वाजता जाहीर सभेत भाजपचे उमेदवार डॉ. के. सुधाकर यांच्यातर्फे प्रचार करणार आहेत. चिक्कबळ्ळापुरातील सभेनंतर बेंगळूर येथील पॅलेस मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत सहभागी होणार असून भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.