For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाब-हरियाणात शेतकऱ्यांचे रेलरोको

06:36 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंजाब हरियाणात शेतकऱ्यांचे रेलरोको
Advertisement

अनेक मार्गांवर प्रवाशांचा खोळंबा, सिरसा येथे शेतकरी नेते नजरकैदेत, चंदीगडला जाणाऱ्या नऊ गाड्या रद्द

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी रविवारी वेगवेगळ्या भागात रेलरोको करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाचा परिणाम हरियाणा आणि पंजाबमध्ये अधिक दिसून आला. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी ऊळांवर ठाण मांडून होते. शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेस्थानक आणि रेल्वेमार्ग परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यादरम्यान हरियाणातील डबवली येथे पोलिसांनी 38 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी चौकीबाहेर शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

Advertisement

संयुक्त किसान मोर्चाने रविवार, 10 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत संपूर्ण देशात रेल्वेगाड्या रोखण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पंजाबमधील अबोहरमध्ये शेतकरी संघटनांनी रेल्वे ट्रॅक अडवला. केंद्र सरकारची कॉर्पोरेट-स्नेही धोरणे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यावर झुकत आहेत. याच्या निषेधार्थ गेल्या 17 दिवसांपासून शंभू सीमेवर ठिय्या आंदोलन सुरू असूनही सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही, असे बीकेयू खोसाचे प्रांतीय सचिव गुणवंत सिंग म्हणाले. शेतकरी आंदोलनामुळे रविवारी भटिंडा-श्रीगंगानगर दरम्यान एकही टेन धावली नाही. सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात संपूर्ण पंजाबमध्ये रेलरोको आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंजाबमध्ये अंबाला विभागांतर्गत 22 रेल्वे मार्गांवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या काळात पंजाब आणि चंदीगडकडे जाणाऱ्या नऊ पॅसेंजर टेन रद्द करण्यात आल्या. यावेळी चंदीगड ते दिल्ली दरम्यान धावणारी शताब्दीही दुपारी चारनंतर तीन तासांच्या विलंबाने दिल्लीला रवाना झाली होती. रेलरोको आंदोलनादरम्यान हरियाणातील सिरसा येथील शेतकरी नेते मिठू सिंग कंबोज यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. मिठू कंबोज यांनी व्हिडिओ जारी करून यासंबंधीची माहिती व्हायरल केली. दुसरीकडे, सिरसामध्ये पोलीस दल, बॅरिकेडिंग, ऊग्णवाहिका आणि फायर इंजिन तैनात करण्यात आले आहेत.

किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) च्या हाकेवर भारतीय किसान युनियन आझाद आणि सिद्धपुरा यांनी सुनम रेल्वे स्थानकावर रेल्वे ऊळ रोखून धरला. केंद्र सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप भारतीय किसान युनियन एकता आझाद आणि सिद्धपुरा या संघटनेच्या नेत्यांनी केला. राज्य सरकारही शेतकऱ्यांप्रती गंभीर नाही. जोपर्यंत केंद्र सरकार आपल्या मागण्यांची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. शेतकऱ्यांकडून शत्रूसारखी वागणूक सहन केली जाऊ शकत नाही. केंद्र आणि हरियाणा सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

मालगाडीच्या इंजिनवर चढण्याचा प्रयत्न

शंभू टोलनाक्मयाजवळील रेल्वे ट्रॅकवर मालगाडीच्या इंजिनवर चढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. त्यावर पोलिसांनी त्यांना तात्काळ थांबवून शेतकरी नेत्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांना माघारी फिरवले. दुसरीकडे एलनाबादमध्ये शेतकरी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

Advertisement
Tags :

.