महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेटफ्लिक्स नावाची जादू

12:02 AM Jan 17, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नेटफ्लिक्स, ऑन डिमांड व्हिडियो स्ट्रिमिंग सेवा काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच झाली आहे. आपण ह्या सेवेच्या माध्यमातून व्हिडिओ स्ट्रिमिंग करु शकतो आणि ह्याच्या येण्याने हा लवकरच सिनेमागृहांची जागा घेणार आहे.

Advertisement

ही अमेरिकेत 18 वर्षांपूर्वी लाँच झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत तेथील लोकांसाठी ही खूप आवडती सेवा झाली आहे. ह्याला अलीकडेच काही दिवसांपूर्वी लाँच केले गेले. ह्याच्या माध्यमातून आपण ऑन-डिमांड व्हिडियो स्ट्रीम करु शकता. आपल्याला कोणताही व्हिडिओ, चित्रपट पाहण्यासाठी मोठी रांग लावावी लागणार नाही. आता घरबसल्याही आपण ह्याच्या माध्यमातून आपल्या पसंतीचा कुठचाही व्हिडियो स्ट्रीम करु शकता.

Advertisement

ह्या सेवेच्या नोंदणीकरिता आपल्याला 500 रुपये प्रति माह पैसे द्यावे लागतील, त्याचबरोबर जर आपल्याला प्अ कंटेंट पाहायची आवड असेल तर, आपल्याला एका महिन्याच्या ह्या प्लॅनमध्ये 150 रुपये अतिरिक्त रक्कम भरावी लागेल आणि ही सेवा मग 650 रुपये महिना अशी होईल.

ह्या सेवेच्या अंतर्गत टीव्हीवर येणारे प्रसिद्ध शो आणि सिनेमांची खूप मोठी साखळी आहे. ही सेवा आपल्याला अधिकृतरित्या मिळत आहे. टोरेंट्सच्या वापराने आपल्या सिस्टममध्ये अनेक भयंकर असे व्हायरस येऊ शकतात. मात्र नेटफ्लिक्समुळे आपल्याला असा कोणताही धोका नाही. ही खूप सुरक्षित सेवा आहे.

सर्वप्रथम आपल्याला नेटफ्लिक्सवर जाऊन आपला आयडी बनवावा लागेल, त्यासाठी नेटफ्लिक्सची वेबसाइट,
ऍनड्रॉईड ऍप, आयओएस ऍप किंवा विंडोज ऍपचा वापर करुन बनवू शकता. 

आयडी बनविल्यानंतर आपण ह्याचा वापर केव्हाही आणि कुठेही करु शकता. मात्र अशा वेळी असा प्रश्न आपल्या मनात येतो की, ह्यात किती प्रमाणात व्हिडिओ असतील. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विदेशी कंटेंट ह्या सेवेत अगदी मोठय़ा प्रमाणात मिळतील, पण भारतीय कंटेंट हळूहळू ह्यात समाविष्ट केला जात आहे. परंतु असेही नाही की, भारतातील सर्वच लोकांना हिंदी आणि भारतीय कंटेंट हवा आहे. आपल्या देशात असेही असंख्य लोक आहेत, ज्यांना विदेशी कंटेंट हवा आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की, ह्या माध्यमातून त्यांना मनोरंजनाचे आणखी एक माध्यम मिळेल, जे त्यांना अगदी सहजपणे उपलब्ध आहे. आणि  ते त्यांना त्यांच्या मोबाईलवरही उपलब्ध होईल.

आपल्यापैकी बऱयाच लोकांना नेटफ्लिक्सवर डाउनलोड फीचरबद्दल माहितच असेल, यात आपण आपलं आवडतं कंटेंट डाउनलोड करू शकता आणि नंतर आपण कुठेही, बस, मेट्रो, रेल्वे किंवा फ्लाइटमध्ये कधीही ते ऑफलाइन मोडवर पाहू शकता.

 नेटफ्लिक्स वापरत असल्यास आणि मुलांना फोन देताना आपण घाबरत असाल की आपले मुलं कुठेही व्हिडिओ बघून काही चुकीचे शिकत तर नाहीये. हे टाळण्यासाठी नेटफ्लिक्सने प्रोफाइल नावाचा पर्याय दिला आहे. यात एक किड्स नाव असा प्रोफाइल आहे. आपण आपल्या मुलाला नेटफ्लिक्सचा उत्तम व्हिडिओ दर्शवू इच्छित असल्यास त्यात किड्स प्रोफाइल ऍक्टिवेट करावे. कंपनीने मुलांकडे विशेष लक्ष देत, त्यात काही विशेष शिक्षित करणारे व्हिडिओ सामील केले आहे. स्मार्टफोनच्या ऍपमध्ये किड्स प्रोफाइल ऍक्टीवेट करण्यासाठी खाली उजव्या बाजूला दिलेल्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला किड्स प्रोफाइल दिसून येईल, त्यावर क्लिक करा आणि निश्चिंतपणे मुलांच्या हातात स्मार्टफोन द्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat
Next Article