निकृष्ट रस्त्यांवर 55 कोटींचा चुराडा...ना यंत्रणेला लाज ना लोकप्रतिनिधींना
: कामाचा दर्जा सुमार : अधिकारी-ठेकेदारांचे संगनमत
प्रतिनिधी सांगली
एकीकडे लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडत असतानाच महापालिका क्षेत्रामध्ये निकृष्ट रस्ते कामांचा धडाका सुऊ आहे. सुमार, दर्जाहिन रस्त्यांच्या कामामुळे 55 कोटी रूपयांचा चुराडा झाला आहे. अधिकारी-ठेकेदारांच्या संगनमत, बेफिकीर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि टक्केवारीची किड यामुळे निकृष्ट कामांना अभय मिळत आहे. जिल्हा, महापालिका प्रशासनाचेही याकडे लक्ष नाही. शहर अभियंता, नगरअभियंता, शाखा अभियंत्यांकडून केवळ पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये रस्ते कामांचा धडाका सुर आहे. जिल्हा नियोजन, महापालिका निधी, विशेष निधीमधून जवळपास 55 कोटींची रस्त्यांची कामे सुऊ आहेत. यामध्ये हॉट मिक्स डांबरीकरण, काँक्रिटीकरण रस्ते कामांचा समावेश आहे. सांगली शहरातील राजर्षी शाहू महाराज (100 फुटी) रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते लक्ष्मीमंदिर, मंगळवार बाजार ते कुपवाड फाटा, रामकृष्ण नगर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, जुना बुधगाव आदी 40 हून अधिक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची कामे युध्दपातळीवर सुऊ आहेत. डांबरीकरण, क्राँक्रिटीकरण रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे बोलले जात होते.
मात्र अधिकारी-ठेकेदारांच्या संगनमतामुळे रस्त्यांच्या कामांची अक्षरश: वाट लागली आहे. अनेक रस्त्यांची कामे निपृष्ट झाली आहेत. सुमार दर्जांच्या रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यावधी ऊपयांचा भ्रष्टाचार सुऊ आहे. अनेक ठिकाणी केवळ मुऊम, खडी टाकली आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा कमी ऊंदीने रस्त्यांची कामे सुऊ आहेत. शहर अभियंता, नगरअभियंता, शाखा अभियंत्यानी मात्र याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दर्जेदार रस्त्यांऐवजी अनेक ठिकाणी केवळ खडीचा धुरळा उडू लागला आहे. याकडे जबाबदार यंत्रणांनी सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
काम, डांबराच्या क्वालिटीकडे दुर्लक्ष
महापालिका क्षेत्रात सुऊ असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासला जात नसल्याचे चित्र आहे. रस्त्यांसाठी लागणाऱ्या डांबराची क्वालिटी तपासली जात नाही. रस्ता खराब होणार नाही. नागरिकांवर तक्रारीची वेळ येणार असे दाबून सांगितले जाते. वास्तविक सुऊ असलेल्या रस्त्यांची कामे पाहता केवळ ठेकेदार पोसण्याचा एककलमी कार्यक्रम महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुऊ आहे. महापालिकेचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे आहे. त्यांनी रस्ते कामांची पाहणी कऊन ठेकेदार, अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज निर्माण झाली आहे.