नव्या विक्रमानंतर सेन्सेक्सची घसरण
वृत्तसंस्था / मुंबई :
चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात मुंबई शेअर बाजारातील(बीएसई) सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात 42,059.45 चा टप्पा गाठत नव्या विक्रमांची नोंद केली आहे. अशी कामगिरी करण्यामागे आंतरराष्ट्रीय आणि देशातील काही घडामोडींचा प्रभाव गुरुवारी शेअर बाजारात राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 42 हजारावर स्पर्श केला परंतु दिवसभरातील व्यवहारानंतर अंतिम क्षणी यात काहीशी घट नोंदवत सेन्सेक्स 59.83 अंकावर स्थिरावून निर्देशांक 41,932.56 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 12.20 अंकावर स्थिरावला असून निर्देशांक 12,355.50 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये नेस्ले इंडियाचे समभाग सर्वाधिक 3.23 अंकानी तेजीत राहिले होते. तर सोबत कोटक बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, पॉवरग्रिड आणि टायटन यांचे समभागही तेजीत राहिले होते. दुसऱया बाजूला एनटीपीसी, हीरोमोटो कॉर्प, टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि ऍक्सिस यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
महत्वांच्या घडामोडींचे पडसाद
मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्धामुळे तणावाचे वातावरण राहिले होते. यामुळे दोन्ही देशातील तणावाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारासोबत भारतीय बाजारावरही राहिले होते. परंतु गुरुवारी दोन्ही देशात व्यापारासंदर्भात करार करण्यात आल्यामुळे जागतिक शेअर बाजारांसह देशातील बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
दुसरीकडे भारतात केंद्र सरकारकडून 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योगासह अन्य व्यापार उद्योगाला दिलासा देणाऱया घोषणेच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात नफा कमाई केल्यामुळे दोन्ही शेअर बाजारात तेजी मिळवण्यास बाजाराला यश मिळाले असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.