नवाजुद्दीन सिद्धीकीचा ‘या’ गोष्टीला रामराम
बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्याची सध्या मोठय़ा प्रमाणावर चर्चा आहे, ज्या अभिनेत्याची मालिका आणि चित्रपटाची प्रेक्षक नेहमीच वाट पाहत असतात अशा नवाझुद्दीन सिद्धीकीनं एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. त्याचे हे विधान करण्यामागे काय कारण आहे याचाही त्यानं खुलास केला आहे. यापूर्वी ओटीटी माध्यमातून प्रेक्षकांच्या लोकप्रियतेस आलेल्या नवाझुद्दीननं हे माध्यम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागील कारणही त्यानं यावेळी सांगितलं आहे. सेक्रेड गेम्सच्या माध्यमातून त्यानं या माध्यमामध्ये प्रवेश केला होता. त्याच्या गणेश गायतोंडेच्या भूमिकेनं प्रेक्षकांना वेड लावले होते. नवाझुद्दीनचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र आता त्याला या मीडियममध्ये काम करण्याची इच्छा नाही. त्यासाठी त्यानं एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढील काळामध्ये त्या माध्यमांमध्ये काम न करणे. ओटीटी प्लॅटफॉर्म हा आता धंदा झाला आहे. त्यामुळे त्याच्यात काम करणं तितकसं समाधान आणि आनंद देणारं नाही. अशी भूमिका नवाझुद्दीनची आहे. त्यामुळे आपल्याला या माध्यमामध्ये काम करायचे नाही. असेही नवाझुद्दीननं सांगितलं आहे. मोठमोठय़ा प्रॉडक्शन हाऊसेसनं या माध्यमांचा धंदा करुन टाकला आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यात फारसं स्वारस्य राहिलं नसल्याचेही त्याने सांगितले आहे.नेटफ्लिक्सनच्या सीरिअस मेनमधल्या भूमिकेसाठी नवाझुद्दीनला इंटरनॅशनल एँमी ऍवॉर्डमध्ये गौरविण्यात आले होते. त्यावेळी एका मुलाखतीमध्ये त्यानं सांगितलं की, आपण यापुढे या माध्यमामध्ये काम करणार नाही. हे माध्यम म्हणजे आता कचऱयाचे मैदान झाले आहे. ज्याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा कचरा येतो आहे. त्यात आशय फारसा प्रेक्षकांना भावत नाही. मात्र तरीही त्यांना ती पाहण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये जास्त काळ थांबण्याची इच्छा नसल्याचे त्याने सांगितले.