नफा कमाईमुळे वधारले एलआयसीचे समभाग
07:00 AM Nov 16, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) च्या समभागात सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत भारतीय जीवन विमा कंपनीचा निव्वळ नफा अनेक पटींनी वाढून तो 15,952 कोटींवर रुपयावर पोहोचला, ज्यामुळे त्यांच्या समभागाचा भाव वधारला होता.
Advertisement
बीएसईवर कंपनीचे समभाग 8.70 टक्क्यांच्या वाढीसह 682.70 रुपयांवर व्यवहार करत होते. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सुरुवातीच्या सत्रात कंपनीचे समभाग 9.11 टक्क्यांनी वाढून 684.90 रुपयांवर पोहोचले असल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील जून तिमाहीत कंपनीने 682.9 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने मे महिन्यात 20,530 कोटी रुपयांची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) सादर केला होता. त्यानंतर हा पहिल्या तिमाहीचा निकाल होता.
Advertisement
Advertisement
Next Article