महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नफा कमाईमुळे बाजारांची पडझड

08:48 PM Jan 15, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवडय़ात पहिल्या दोन दिवस (सोमवार-मंगळवार) आपल्या कामगिरीचा धडाका कायम ठेवला होता. त्यातच नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली होती. तिसऱया सत्रात मात्र नफा कमाईमुळे बाजारात पडझड झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील व्यवहारात बुधवारी तिसऱया सत्रात बँकिंगमधील समभागात नफा कमाईची नोंद करण्यात आली होती.

दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 79.90 अंकानी घसरुन निर्देशांक 41,872.73 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 19 अंकानी घसरुन निर्देशांक 12,343.30 वर बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक म्हणजे 5.44 अंकानी घसरले आहेत. तर इन्फोसिस, स्टेट बँक, पॉवरग्रिड, टेक महिंद्रा, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग 1.21 अंकानी घसरले आहेत. दुसरीकडे हीरोमोटोकॉर्प, टायटन, मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टीसीएस, बजाज ऑटो आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग मात्र 2.58 अंकानी वधारले आहेत.

दुसरीकडे डिसेंबर तिमाहीतील कंपन्यांची नफा कमाईची आकडेवारी सादर होण्यास सुरुवात झाली आहे. यांचा प्रभाव गुंतवणूकदारांवर काहीशा प्रमाणात पडत आहे.  तिमाही आकडेवारीचा अंदाज घेत गुंतवणूकादार निर्णय घेत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.   

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 अमेरिका आणि चीन यांच्यातील होणाऱया व्यापारी करारा संदर्भातील होणाऱया प्रस्तावांवर अजूनही अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय शेअर बाजारासह भारतीय बाजारातील घडामोडींवर पडत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Advertisement
Tags :
#business#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article