नजीकच्या काळात दूध दरातील वाढ नाही : अमूल
नवी दिल्ली :
अमूलच्या दूध दरात कोणत्याही वाढ होणार नाही, अशी माहिती कंपनीने दिली आहे. डेअरी कंपन्यांनी गेल्या तीन वर्षात दोनवेळा दूध दरात वाढ केली आहे. आता दूध उत्पादनांच्या दरात वाढ करण्याची कोणतीही योजना नाही, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, काही मोठय़ा डेअरी कंपन्यांनी दूध दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
डेअरी कंपन्यांनी गेल्या तीन वर्षात दोनदा दूध दरात वाढ केली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱयाच्या उत्पन्नात 2018 च्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोडी यांनी सांगितले आहे. अर्थसंकल्पात दुग्ध उद्योगाला चालना देण्याचे बरेच प्रस्ताव आहेत. अर्थमंत्र्यांनी घोषणाला केली होती की, देशातील दूध प्रक्रियांचे आकडे 2025 पर्यंत 53.5 दशलक्ष मेट्रिक टनवरून दुप्पट करत 108 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत पोहचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी 40 हजार ते 50 हजार कोटी गुंतवणुकीची गरज आहे, असेही सोढी यांनी सांगितले.