नकारात्मक संकेतामुळे सेन्सेक्स-निफ्टी घसरणीत
सेन्सेक्सची 230 अंकांनी पडझड : टायटन, महिंद्रा व मारुती नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ात भारतीय भांडवली बाजाराने सलग दोन दिवस आपल्या कामगिरीचा नवा उच्चांक प्राप्त करत आपली दमदार कामगिरी नोंदवली होती. मात्र आठवडय़ातील गुरुवारच्या सत्रात मात्र जागतिक पातळीवरील नकारात्मक घडामोडींच्या परिणामामुळे भारतीय शेअर बाजार प्रभावीत होत बंद झाला आहे. यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक पडझडीसह बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 230.12 अंकांनी प्रभावीत होत 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह निर्देशांक 61,750.60 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 65.75 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 18,343.90 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये टायटन, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, एचडीएफसी, डॉ.रेड्डीज लॅब, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो, पॉवरग्रिड कॉर्प, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल यांचे समभाग वाढीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील एकूण स्थिती पाहिल्यास यामध्ये आशियातील अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरणीसोबत बंद झाले आहेत. तर युरोपीयन बाजार दुपारपर्यंत नकारात्मक कल प्राप्त करत राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.46 टक्क्यांच्या घसरणीसोबत 92.43 डॉलर प्रति बॅरेलच्या किमतीवर राहिले आहे.
यावेळी शेअर बाजारात अस्थिर आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी निव्वळ 386.06 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली असल्याची माहिती आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- अदानी एंटरप्रायझेस 4018
- लार्सन टुब्रो....... 2029
- आयसीआयसीआय 919
- भारती एअरटेल... 846
- एचडीएफसी लाईफ 531
- पॉवरग्रीड कॉर्प.... 218
- युपीएल............. 771
- अदानी पोर्ट्स...... 890
- ऍक्सिस बँक........ 858
- रिलायन्स......... 2599
- इंडसइंड बँक..... 1146
- ओएनजीसी........ 143
- हिरोमोटो कॉर्प.. 2744
- जेएसडब्ल्यू स्टील. 708
- डीव्हीज लॅब्ज.... 3290
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टायटन............ 2582
- महिंद्रा अँड महिंद्रा 1259
- टाटा मोटर्स........ 423
- अपोलो हॉस्पिटल 4400
- आयशर मोटर्स... 3441
- मारुती सुझुकी... 8986
- हिंडाल्को............ 440
- बजाज ऑटो...... 3694
- एचडीएफसी..... 2659
- डॉ. रेड्डीज लॅब्ज. 4421
- बजाज फिनसर्व्ह 1664
- एचसीएल टेक... 1092
- कोल इंडिया........ 232
- ग्रेसीम ............ 1710
- एनटीपीसी......... 168
- इन्फोसिस........ 1587
- एचडीएफसी बँक 1618
- कोटक महिंद्रा.... 1950
- टेक महिंद्रा....... 1058
- एचयुएल.......... 2460
- टाटा स्टील......... 105
- अल्ट्राटेक सिमेंट. 6871
- नेस्ले.............. 19991
- सनफार्मा......... 1013
- बीपीसीएल........ 305
- विप्रो 396