‘द काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकांना ‘वाय’ सुरक्षा
07:00 AM Mar 19, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
Advertisement
देशभरातील सिनेशौकिनांना भुरळ घालणाऱया बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. विवेक अग्निहोत्री यांना धोका असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या कमाईचा टप्पा गाठेल असे संकेत मिळत आहे. देशाच्या विविध भागांमध्ये हा चित्रपट सध्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे. काश्मिरी पंडितांच्या समस्यांची व्यथा मांडल्यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे.
Advertisement
Advertisement
Next Article