देशात सौर क्षमतेत झाली वाढ
2019 च्या तुलनेत वृद्धी कमीच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात कोविडच्या प्रभावामुळे 2020 मध्ये 3,239 मेगावॅट सौर क्षमता वाढली आहे. ही वाढ मागच्या वर्षाच्या (2019) तुलनेत 56 टक्क्यांनी कमी राहिली आहे. एका अहवालानुसार 2021 मध्ये यामध्ये उल्लेखनीय वृद्धीचे संकेत आहेत. मेरकॉम इंडिया रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये भारताच्या सौर क्षमतेत चांगली वाढ दिसली आहे. वर्ष 2019च्या आधारे हा आकडा 7,346 मेगावॅटने कमी राहिल्याची माहिती आहे.
यामध्ये डिसेंबर 2020 च्या स्थितीनुसार भारतामध्ये सौर ऊर्जेची एकूण स्थापित क्षमता ही 39,000 मेगावॅट होती. तसेच सोबत जोडलेल्या प्रकल्पाची क्षमतेची हिस्सेदारीही 2,520 मेगावॅट म्हणजेच 78 टक्क्यांवर राहिली आहे. हा दर वर्षाच्या आधारे 60 टक्क्यांनी कमी राहिला आहे. या 719 मेगावॅटची मुख्य हिस्सेदारी छतावर लावण्यात येणाऱया सौर प्रकल्पाची आहे.
सौर क्षमतेमधील मुख्य राज्ये
देशातील सौर क्षमतेत आपले स्थान निर्माण करणाऱया राज्यांमध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, राजस्थान आणि गुजरात यांचा समावेश आहे. मागील वर्षी एकूण सौर क्षमतेत या राज्यांची हिस्सेदारी जवळपास 51 टक्क्यांवर राहिली आहे.