देशातील वनस्पती तेलाच्या मागणीत घसरण
खाद्य तेलाच्या विक्रीत एका तिमाहीची घसरण शक्मय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या छायेमुळे भारतीय बाजारावर मंदीचे सावट दिवसेंदिवस गडद होत
असल्याचे दिसून येत आहे. याचेच एक वास्तव म्हणून सध्या देशातील वनस्पती तेलाच्या मागणीत
घसरण झाली आहे. दशकात प्रथमच वनस्पती तेलामध्ये मोठी घसरण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
केंद्र सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली असल्यामुळे देशातील रेस्टॉरन्ट
बंद झाले आहेत. परंतु याचा थेट परिणाम खाद्य तेलाच्या मागणीवर झाल्याने मागणीत मोठी
घसरण झाली आहे.
खाद्य तेलाचे जगभरात सर्वाधिक आयात करणार देश म्हणून मागील काही
वर्षांपासून भारताची ओळख आहे. मागील दोन दशकापेक्षा अधिक वेळ ही मागणी तीन पट झाली होती. क्यापार आणि उद्योग क्षेत्रातील
जाणकारांच्या माहितीनुसार भारतामधील वनस्पती तेलाची मागणी मूळ रुपात पाम तेल आणि सोयाबीन
तेलाची मागणी मागील वर्षात 23 दशलक्ष टनाच्या तुलनेत यंदा घसरणार आहे.
बंदच्या काळातील घसरण
संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यामुळे देशातील वनस्पती तेलाची विक्री
कमीत कमी एक तिमाही इतकी घसरण होण्याचा अंदाज काही एजन्सेंनी मांडला आहे. यामुळे खाद्यतेल
उद्योगाला फटका बसला आहे.
तर बंदच्या काळात 475,000 टन इतकी खाद्य तेलाची मागणी कमी होण्याची माहिती वनस्पती
तेल आयात ग्रुप सनविनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बजोरिया यांनी दिली आहे.
महिन्यामध्ये 19 लाख टन विक्री
भारतामधील विक्री एक महिन्यांमध्ये 19 लाख टन खाद्य तेलाची विक्री होते. देशातील
एकूण वनस्पती तेलाच्या आयीत दोन तृतीवंश हिस्सा पाम तेलाचा येतो. मलेशिया आणि इंडोनेशिया यासारख्या पाम तेल उत्पादन
करणाऱया देशाच्याप्रमाणे भारातच्या मागणीसह आउटपुटही कमी होणार असल्याचे बजोरिया यांनी
सांगितले आहे.