महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

देशातील अब्जाधीशांची संपत्ती वार्षिक बजेटपेक्षा अधिक

08:38 PM Jan 20, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑक्सफेमचा अहवाल सादर : 1 टक्का अब्जाधिशांकडे 70 टक्के गरिबांपेक्षा 4 पट संपत्ती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील आर्थिक असमानतेचा अंदाज सद्यस्थितीवरून लावला जातो. ते म्हणजे फक्त एक टक्का श्रीमंतांकडे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 70 टक्के गरिबांच्या तुलनेत चार पटीने अधिक संपत्ती आहे. ऑक्सफेमकडून वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या 50 व्या वार्षिक बैठकीत ‘टाईम टू केअर’ अहवाल मांडण्यात आला आहे. देशातील सर्व अब्जाधिशांची एकूण संपत्ती देशाच्या वार्षिक बजेटपेक्षा अधिक आहे. जगातील 2153 अब्जाधिशांकडे 4.6 अब्ज लोकांपेक्षा (जगातील 60 टक्के लोकसंख्या) सर्वाधिक संपत्ती आहे, असेही या अहवालातून सांगण्यात आले आहे.

जगभरातील आर्थिक असमानता तेजीने वाढत असल्याचेही या अहवालातून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी अब्जाधिशांच्या एकत्रित संपत्तीत काहीशी घट झाली आहे. मात्र, गेल्या दशकात अब्जाधिशांची संख्या दुप्पटीपेक्षा अधिक वाढली आहे. श्रीमंत आणि गरिबांमधील फरक असमानता कमी करण्याच्या धोरणांनी कमी होणार नसून, काही सरकार अशा फरकाला कमी करण्याच्या दिशेने काम करत आहेत, असे ऑक्सफेम इंडियाचे सीईओ अमिताभ बहर यांनी सांगितले. 

भारतात 63 अब्जाधिशांची एकूण संपत्ती भारताच्या 2018-19 च्या 24,42,200 कोटी रुपये बजेटपेक्षाही अधिक आहे. आमची विस्कटलेली अर्थव्यवस्था सामान्य लोकांच्या हक्कांना मारून अब्जाधीश आणि मोठय़ा व्यापाऱयांचा फायदा करत आहे, असेही बहर यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
#billionaire's wealth#nnual budget#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article