दूरसंचार क्षेत्रात ‘जिओ’ची बाजी
36.9 कोटी ग्राहकांसह ठरली देशातील सर्वोच्च कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्राहकांची सर्वाधिक जोडणी करत देशात 36.9 कोटी ग्राहक संख्येच्या जोरावर रिलायन्स जिओ नोव्हेंबर 2019 मध्ये देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरली आहे. अशी माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय) यांच्याकडून देण्यात आली आहे.
नोव्हेंबरमध्ये व्होडाफोन आयडिया मोबाईल ग्राहकांची संख्या 33.62 कोटी आणि भारती एअरटेलची ग्राहक संख्या 32.73 कोटीच्या घरात पोहोचली आहे. देशात एकूण दूरसंचार ग्राहकांची संख्या नोव्हेंबरमध्ये 2.4 टक्क्यांनी घटून 117.58 कोटीवर राहिली आहे. की जी ऑक्टोबरला 120.48 कोटी राहिली होती. नोव्हेंबर महिन्यात व्होडाफोन आयडिया यांचे ग्राहक सर्वाधिक 3.6 कोटीने घटले आहेत. याच काळात रिलायन्स जिओने मात्र 56लाख नवीन ग्राहकांची जोडले आहेत. भारती एअरटेलकडून 16.59 लाख आणि बीएसएनएल कंपनीने 3.41 लाख ग्राहकांना आपल्यासोबत जोडले आहे.