कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘त्या’ घटनेतील मुख्य संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला

06:37 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

न्यू वंटमुरी येथील त्या घटनेतील मुख्य संशयिताचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. शिवाप्पा रायाप्पा व्हनुरी असे त्या संशयिताचे नाव आहे. वंटमुरी येथील घटनेतील हा मुख्य आरोपी आहे. त्याने जामीन मिळावा यासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र सदर गुन्हा अत्यंत गंभीर असून 11 वे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश ई. एस. ईरण्णा यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Advertisement

एका गावातील संशयित व इतरांनी घरावर हल्ला करून महिलेला मारहाण केली होती. याप्रकरणी काकती पोलीस स्थानकामध्ये भा.दं.वि. 143, 147, 148, 341, 342, 327, 323, 324, 307, 501, 427, 354 बी सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. त्या संशयिताने आणि आणखी एका महिलेने जामीनसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र या दोघांचे अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. सरकारी वकील शैलजा पाटील यांनी या दोघांनाही जामीन देऊ नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने दोघांचेही जामीन अर्ज फेटाळले आहेत.

Advertisement
Tags :
# insuli# Banda # 1 crore seized; A possession in Rajasthan#Tarun Bharat news##tarunbharat
Next Article