तोंडापेक्षा मोठे अंडे क्षणभरात गिळले...
निसर्ग हा अनेक अतक्मर्य आणि अनोख्या चत्मकारांनी भरलेला आहे. प्राणीसृष्टी तर या चत्मकारांचे एक मोठे भांडारच आहे. एका छोटय़ा सापाने आपल्या तोंडापेक्षा चौपट मोठे अंडे क्षणभरात गिळल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अजगर मोठमोठय़ा प्राण्यांना गिळून फस्त करतो, याचे आपल्याला आश्चर्य वाटत नाही. अजगर स्वतःच प्रचंड मोठा असतो. तथापि, जो साप एक लहान बेडूकही गिळू शकेल, असे त्याच्याकडे बघून वाटत नाही, त्याने शहामृगाचे अंडे काही क्षणात गिळंकृत करावे, ही बाब निसर्गाचे सामर्थ्य दाखवून देणारी आहे.
हा व्हिडिओ घाबरवून सोडणारा आहे, अशी प्रतिक्रिया अनेक दर्शकांनी दिली आहे. एका छोटय़ा सापाकडून त्याच्या शरीरापेक्षाही काहीपट मोठे अंडे गिळले जावे, ही घटना सजीव प्राण्याला अन्नाची किती आवश्यकता असते आणि पोट भरण्यासाठी तो कसे कोणतेही साहस करण्यास प्रवृत्त होतो, हे दर्शविणारी आहे. एवढे मोठे अंडे गिळल्यानंतर आता या सापाला चार-सहा दिवस भूक लागणार नाही. निसर्गाने विविध प्राणीप्रजातींना त्यांचे पोट भरण्यासाठी जी अनेक कौशल्ये आणि तंत्रे प्रदान केली आहेत, त्यांना खरोखरच तोड नाही, असेच म्हणावे लागते. अंडे गिळल्यानंतर सापाचे तोंड पाहणारे दर्शक अक्षरशः आपल्या तोंडात बोटे घालतात. लक्षावधी लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून निसर्गाच्या अचाट विविधतांविषयी आपल्या कॉमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ गीतांजली नामक एका आयएफएस अधिकाऱयाने पोस्ट केल्याचे दिसून येते.