महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ते सगळं सिनेमातील एखाद्या सीनपेक्षा कमी नव्हतं

09:03 PM Apr 14, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आपल्या हॉट अंदाजाने नेहमीच लक्ष वेधून घेत असलेली अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा गेल्या आठवडय़ाभरात बातम्या आणि सोशलमीडियातील पोस्टमध्ये चर्चेत आली ती तिच्या कार अपघातामुळे. मुंबई पुणे हायवेवर काही कार एकमेकांना धडकल्या ज्यामध्ये मलायकाचीही कार होती. अपघातातून बरी झाल्यावर हाच अनुभव सांगणारी पहिली पोस्ट मलायकाने तिच्या इन्स्टा पेजवर शेअर केली आहे. भली मोठी नोटमध्ये मलायकाने, मी फायटर असून लवकरच यातून सावरत कमबॅक करणार असल्याचे सांगितल्याने तिच्या चाहत्यांचा जीव भांडय़ात पडला आहे.

Advertisement

3 एप्रिलला पुण्याहून मुंबईला जात असताना मलायकला अपघात झाला होता. त्यानंतर उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि स्टाफने तिच्यावर खूप चांगले उपचार केले. डिस्चार्ज घेऊन घरी गेल्यावर तिचा बॉयप्रेंड अर्जुन कपूरनेही तिची भेट घेतली. सध्या ती घरी पूर्ण विश्रांती घेत असून अजून पूर्ण बरी झाली नाही. मी बरी होण्याची वाट पहात असून, त्यानंतर जोरदार कमबॅक करणार असल्याचे म्हणताना आयुष्यात येणाया कोणत्याही संकटाचा सामना करायला मला नेहमीच आवडतं. त्यामुळे या अपघातातून मी सावरले आहे. पण या काळात मला आधार दिलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानते असंही ती या पोस्टमध्ये म्हणाली.

Advertisement

खिडकीतून बाहेर बघत असलेल्या फोटोसोबत मलायकाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, गेल्या आठवडाभरात जे घडलं ते खूपच अनपेक्षित होतं. त्या अपघाताबद्दल आता मी जेव्हा विचार करते तेव्हा असं लक्षात येतं की, सिनेमात आम्ही ज्या गोष्टी सीन म्हणून शूट करतो तो प्रसंग माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात घडला.  सुदैवाने मला लगेच उपचार मिळाले. हॉस्पिटलमध्ये नेणाऱयांपासून माझ्यावर उपचार करणाऱया प्रत्येकाची मी आभारी आहे. मला डिस्चार्ज मिळाला असला तरी अजून अशक्तपणा आहे. मला विश्रांतीची गरज आहेच, पण याकाळात माझे मित्रमैत्रिणी यांनी दिलेल्या आधारामुळे मला बळ आले आहे. माझे कुटुंबही माझ्यासोबत आहे. मलायकच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी गेट वेल सून यासह अनेक कमेंट केल्या आहेत. सध्या तरी मलायका बरी होत असून त्यानंतर कमबॅक करण्यासाठी कोणत्या शो ची निवड करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article