For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉलरचा दबदबा होतोय कमी

08:28 PM Jan 24, 2020 IST | Tarun Bharat Portal
डॉलरचा दबदबा होतोय कमी
Advertisement

आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञाचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था/ दावोस

जगभरात व्यवहारासाठी देवाणघेवाणीसाठी डॉलरचा सर्वाधिक वापर करण्यात येतो आहे. परंतु आता लवकरच या डॉलरची जागा चीन सारख्या देशातील चलन युआन घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर डॉलरला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञा गोपीनाथ यांनी इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमावेळी म्हटले आहे. 

Advertisement

जागतिक पातळीवरील विविध संस्था जगभरातील डॉलरचा दबदबा समाप्त करण्यासाठी विविध स्तरावरुन जोर दिला जात आहे. या संस्थाच्या मतानुसार त्यांना स्थिर आणि लवकर विकसित होणाऱया चलनाची  आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

डॉलरचा दबदबा

युरो चलनास खुप कालावधीपासून संधी दिली आहे परंतु हे चलन हवी ती उंची गाठू शकणारे नाही. तर दुसरीकडे चीन आपले चलन आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहारांसाठी वापरात यावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

चलनाचा प्रभाव

ऐतिहासिक काळापासून जागतिक  व्यापारात कायम एकाच चलनाचा दबदबा राहिलेला आहे. एक वेळी ब्रिटिश पाउंडचा वापर व्यापार व्यवहारत करत होते. सध्या मात्र डॉलरचा वापर होत आहे. याच डॉलरचा दबदबा पुन्हा सक्षम केल्यास त्याचे पडसाद यूरोसह अन्य तीन मुख्य चलनांवर होणार असल्याचे गीता  गोपीनाथ यांनी यावेळी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.