‘टीसीएस’ला अमेरिकेच्या वॉलग्रीनकडून 10650 कोटीचे कंत्राट
सर्वात मोठे कंत्राट मिळाले : डब्लूबीएचे विकासाचे ध्येय
वृत्तसंस्था/बेंगळूर
भारतीय आयटी कंपनी टीसीएसला अमेरिकेतील रिटेल आणि होलसेल फार्मा कंपनी वॉलग्रीन्स बूट्स एलायंस (डब्लूबीए) यांच्याकडून 1.5 अब्ज डॉलरचे (10,650 कोटी रुपये) कंत्राट मिळाले आहे. रिटेल वर्टिकलमधील टीसीएसचे हे सर्वात मोठे कंत्राट असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 10 वर्षाच्या कंत्राटासह टीसीएस 136.9 अब्ज डॉलर (9.77 लाख कोटी रुपये) इतका महसूल असणाऱया डब्लूबीएची सर्व आयटीची कामगिरी हाताळणार आहे. यामध्ये डब्लूबीएचे ऍप्लिकेशन मेंटनन्स-सपोर्ट, पायाभूत सुविधा आणि सुरक्षित ऑपरेशनची जबाबदारी टीसीएसकडे असणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
डब्लूबीए मागील 10 वर्षांपासून ग्राहक
वॉलग्रीन्सपासून रिटेल सेगमेंटमध्ये सर्वात मेठे कंत्राट मिळाले आहे. नवीन कंत्राटाबाबत अगोदरपासूनच चर्चा सुरु होती. डब्लूबीए ही कंपनी मागील 10 वर्षांपासून टीसीएस कंपनीची ग्राहक असल्याची माहिती टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी दिली आहे.
डब्लूबीएची डिजिटल बदलाकडे वाटचाल
कंपनी जागतीक पातळीवर आयटी ऑपर्रेटिंग मॉडेल उभारण्याचे काम करत असून या प्लॅटफॉर्मचा वापर करुन डिजिटलच्या कामगिरीवर भर देण्यात येणार असल्याचे डब्लूबीएचे सिनीअर उपाध्यक्ष आणि ग्लोबल मुख्य माहिती अधिकारी फ्रान्सेस्को टिन्टो यांनी सांगितले आहे.