टाटा मोर्ट्सची विक्री 27 टक्क्यांनी वधारली
07:00 AM Mar 04, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : टाटा मोर्ट्स कंपनीची फेब्रुवारी महिन्यात देशातील एकूण विक्री वर्षाच्या आधारे 27 टक्क्यांनी वधारुन 73,875 इतकी झाली आहे. कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये 58,366 युनिटसचा पुरवठा डिलर्सकडे केला होता. टाटा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात देशातील बाजारात प्रवासी वाहनांची विक्री 47 टक्क्यांनी वधारुन 39,981 वर पोहोचली आहे. जी मागील वर्षातील समान महिन्यात 27,225 इतकी होती. समीक्षकांच्या माहितीनुहार देशात व्यावसायिक वाहनांची विक्री हि 9 टक्क्यांनी वधारुन 33,894 वर राहिली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article