महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झोमॅटोकडून 2500 कोटींना फूड कंपनी ‘उबर ईट्स’वर ताबा

08:38 PM Jan 21, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतातील 9.99 टक्के हिस्सेदारी झोमॅटोकडे

Advertisement

त्तृसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील ऑनलाईन अन्न पुरवठा करणारी मुख्य कंपनी झोमॅटोने उबर ईट्सची भारतामधील व्यापाराची खरेदी केली आहे. हा व्यवहार तब्बल 350 दशलक्ष डॉलर म्हणजे 2500 कोटी रुपयांना केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे  उबर ईट्सवर आता खाण्याच्या ऑर्डर देता येणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे.

संपन्न झालेल्या सदरच्या व्यवहारात उबर ईट्सची झोमॅटोने 9.99 टक्क्यांनी हिस्सेदारी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आता झोमॅटोची हिस्सेदारी 22.71 टक्क्यांवर पोहोचली आहे. अशी माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे.

भारतात सेवा देण्याचा गर्व

भारतील 500 हून अधिक शहरांमध्ये झोमॅटो अन्न पुरवठा सेवा देणारी कंपनी बनल्याचा आम्हाला मोठा अभिमान असल्याचे मत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांनी व्यक्त केले आहे.

नुकसानीत उबर

उबर ईट्स कंपनीने भारतात 2017 मध्ये प्रवेश केला. आणि भारतातील 41 शहरांमध्ये त्यांची 26  नोंदणीकृत रेस्टॉरन्ट  आहेत.  झोमॅटो सध्या जगातील जवळपास 24 देशात आपला व्यवसाय करत आहे. आणि त्यांची 15  रेस्टॉरन्ट आहेत. यात उबरला मात्र 2019 च्या पहिल्या पाच महिन्यासह आणि डिसेंबरपर्यंत उबरला अन्न पुरवठा करण्याच्या व्यवसायात नुकसान झालेले होते.

Advertisement
Tags :
#business#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article