महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘ज्युरासिक वर्ल्ड’च्या नव्या चित्रपटात स्कार्लेट

08:26 PM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मार्व्हल युनिव्हर्सची एव्हेंजर्स फ्रेंचाइजीद्वारे चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सन ही हॉलिवूढच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मोठ्या पडद्यावर स्कार्लेटला पुनरागमन करताना पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. याचदरम्यान अभिनेत्रीने स्वत:च्या आगामी चित्रपटासंबंधी माहिती दिली आहे.

Advertisement

एका नव्या चित्रपटात स्कार्लेट ही हॉलिवूड सुपरस्टार क्रिस प्रॅटसोबत दिसून येणार आहे. हॉलिवूडची यशस्वी चित्रपट फ्रेंचाइजी ज्युरासिक वर्ल्ड’मध्ये स्कार्लेटने स्थान मिळविले आहे. ज्युरासिक फ्रेंचाइजीचा हिस्सा होण्यासाठी मी मागील 10 वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. आता आगामी काळात ज्युरासिक वर्ल्डच्या चौथ्या चित्रपटात मी दिसणार हे निश्चित झाले आहे. चित्रपटाची कहाणी अत्यंत आकर्षक असल्याचे स्कार्लेटने म्हटले आहे.

Advertisement

ज्युरासिक वर्ल्डची मी नेहमीच चाहती राहिली आहे. ज्युरासिक वर्ल्ड 4 चा हिस्सा होता येणार असल्याने मी अत्यंत आनंदी असल्याचे स्कार्लेटने नमूद केले आहे.

अभिनेत्री म्हणून स्कार्लेटने 1994 मध्ये ‘नॉर्थ’ या चित्रपटाद्वारे स्वत:ची कारकीर्द सुरू केली होती. सुमारे 30 वर्षांच्या कारकीर्दीत ती फॉल, घोस्ट वर्ल्ड, द आइसलँड, लॉस्ट इन ट्रान्सलेशन, लुसी आणि एव्हेंजर्स फ्रेंचाइजीच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article