जिल्हय़ातील रुग्णवाढीला लगाम!
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात मंगळवारी कोरोनाचे 7 रूग्ण आढळून आले आहेत़ मागील काही दिवसांत अचानक वाढलेल्या कोरोना रूग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण होत़े मात्र मंगळवारी नव्या रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे वातावरण राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालायकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 442 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 3 तर ऍन्टीजेन चाचणीत 4 असे एकूण 7 नवे पॉझिटिव्ह आढळून आल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 4, चिपळूण 2 व लांजा 1 असे रूग्ण आढळल़े यामुळे जिह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 10 हजार 463 झाली आह़े मंगळवारी 28 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े असून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 9 हजार 863 वर पोहोचली आह़े जिह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.26 टक्के असून मृत्यूदर 3.54 आह़े