महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा!

08:20 AM Nov 22, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निवडणूक झालेल्या 7 पैकी 5 जगांवर कब्जा

Advertisement

प्रतिनिधी/ रत्नािगरी

Advertisement

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या 7 जगांवर झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलने 7 पैकी 5 जगांवर विजय प्राप्त केल़ा तर 3 विद्यमान संचालकांना या निवडणुकीत पराभवाला समोर जावे लागल़े तसेच विरोधी पक्षाचे अजित यशवंतराव व लांजा तालुका भाजपा अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर हे प्रथमच जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडून आले आहेत़

  यापूर्वी 21 पैकी 14 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होत़े त्यामुळे आता जिल्हा बँकेवर 21 पैकी 19 संचालक निवडून आणत सहकार पॅनलने आपला दबदबा असल्याचे दाखवून दिल़े शहरातील जयस्तंभ येथील जिल्हा नगर वाचनालय येथे रविवारी सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरूवात झाल़ी सहकारचे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सोपान शिंदे व निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सहकार पॅनल व भाजपा प्रणित आघाडीचे कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणी एकत्र जमा झाले होत़े 

  मतमोजणीत रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील एकूण 41 पैकी 33 मते मिळवून विजयी ठरल़े तर त्यांच्याविरूद्ध प्रल्हाद महादेव शेटय़े यांना 8 मते मिळाल़ी लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे विद्यमान संचालक आदेश दत्तात्रय आंबोळकर यांना 16 तर महेश रवींद्र खामकर यांना 18 मते प्राप्त झाल़ी खामकर हे केवळ 2 मतांनी प्रथमच जिल्हा बँकेवर निवडून आल़े गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी हे 23 पैकी 13 मते मिळवून विजयी ठरले तर त्यांच्याविरूद्ध असलेले चंद्रकांत धोंडू बाईत यांना 8 मते मिळाल़ी 

दुग्ध संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे विद्यमान संचालक गणेश यशवंत यांना पराभवाला समोर जावे लागल़े  लाखण यांना 35 पैकी 10 मते मिळाली तर त्यांच्याविरूद्ध असलेले अजित रमेश यशवंतराव हे 25 मते मिळवून विजयी ठरल़े नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज हे 112 मतांपैकी 66 मते मिळवत विजयी ठरले तर त्यांच्याविरूद्ध असलेले सुजित भागोजी झिमण यांना 56 मते प्राप्त झाल़े मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते यांना 93 पैकी 48 मते मिळवून विजयी ठरल़े तर राकेश श्रीपत जाधव यांना 45 मते प्राप्त झाल़ी विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सुरेश मारूती कांबळे हे विजयी झाले. त्यांच्याविरुद्ध सचिन चंद्रकांत बाईत हे उभे होते.

  जिल्हा बँक अध्यक्ष डॉ. चोरगेंना धक्का

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागला असून 21 पैकी 2 जागांवर सहकार पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे. पराभूत झालेले दोन्हीही उमेदवार शिवसेनेचे असल्याने शिवसेनेला सहकार क्षेत्रात हा जोरदार धक्का आहे. तर परिवर्तन पॅनलच्या संचालकांचा 2 हा आकडा छोटा दिसला असला तरीही आम्ही निवडणूक ‘बिनविरोध’ करणार असे सांगत सर्वपक्षीय पॅनल स्वतःच निवडणाऱया जिल्हा बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना हा धक्का आहे, अशा प्रतिक्रिया या निवडणुकीनंतर उमटत आहेत.

परिवर्तनच्या यशवंतराव, खामकरांचा विजय 

या निवडणुकीत 21 पैकी 7 जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील घोषित 7 जागांपैकी 2 जागांवर अजित यशवंतराव व महेश खामकर या परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांचा विजय झाला. तर सहकार पॅनेलच्या दोघांना पराभव पत्करावा लागला. सहकार पॅनेलचे 21 पैकी 14 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. पुन्हा एकदा रत्नागिरी तालुक्यात शिवसेना असल्याचे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article