जानेवारीत कोल इंडियाचे उत्पादन वाढले
कोल इंडियाकडून माहिती सादर : भविषयात उत्पादन वाढीचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोल इंडियाचे कोळसा उत्पादन जानेवारी 2020 मध्ये तब्बल 10.7 टक्क्यांनी वाढले आहे. कंपनीने चालू महिन्यातील प्रत्येक दिवसाला 20 लाख टन कोळसा उत्पादन करण्यात आल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली आहे. चालू वर्षातील जानेवारीच्या 27 तारखेपर्यंत उत्पादन 10.7 टक्क्यांनी वधारले आहे.
महिन्याच्या पातळीवर हे उत्पादन जानेवारी पर्यंत 5.48 कोटी टनावर राहिले आहे. मागील वर्षातील तुलनेत हे उत्पादन 52.3 लाख टन अधिक राहिले आहे. हि उत्पादन वाढ महानदी कोलफील्ड्स आणि साऊथ इस्टर्न फोलफील्ड्स या कारणांमुळे झाली असल्याची माहिती कंपनीतील एका अधिकाऱयांने दिली आहे.
जानेवारीच्या शेवटपर्यंत हे उत्पादन 80 लाख टन अधिक होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. उपलब्धमाहितीनुसार कोळशाच्या उठाव 27 जानेवारी 2020 पर्यंत 4.807 कोटी टन झाला आहे हाच मागील वर्षात याच कालावधीच्या तुलनेत 6.2 टक्क्यांनी अधिक प्रमाणात राहिला आहे.
वीज निर्मितीस कोळसा पुरवठा
वीज निर्मिती प्रकल्पासाठी कोळशाची कोणत्याही प्रकारची कमतरता नसून 6.566 कोटी टन कोळासा यासाठी उपलब्ध असल्याची माहिती एका अधिकाऱयांनी दिली आहे. वीज प्रकल्पाच्या ठिकाणी 26 जानेवारीपर्यंत 3.425 कोटी टन उपलब्ध कोळशांचा