For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगन्नाथ यात्रा यंदा दोन दिवसांची

12:26 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगन्नाथ यात्रा यंदा दोन दिवसांची
Advertisement

तब्बल 53 वर्षांनंतर अशापद्धतीचा योग : 7 जुलैला संध्याकाळी यात्रा प्रारंभ

Advertisement

वृत्तसंस्था/ पुरी

यंदा पुरीतील जगन्नाथ रथयात्रा दोन दिवस चालणार आहे. 7 जुलै रोजी दिवसभर पूजा परंपरा सुरू राहणार असून दुपारी चारच्या सुमारास रथयात्रा सुरू होण्याची शक्मयता आहे. सूर्यास्तानंतर रथ चालविला जात नाही, त्यामुळे रथ मार्गातच थांबवले जातील. सोमवार, 8 रोजी पहाटे पुन्हा रथ निघणार असून त्याच दिवशी गुंडीचा मंदिरात पोहोचतील. तब्बल 53 वर्षांनंतर अशापद्धतीने दोन दिवस रथयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. रथयात्रेअंतर्गत होणारे ‘नबजौबाचे दर्शन’ आणि ‘नेत्र उत्सव’ही तिथीनुसार साजरे केले जाणार असून त्यानंतर दोन दिवस रथयात्रा काढण्यात येणार आहे. यंदा आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तारखा कमी झाल्यामुळे रथयात्रेपूर्वीची पूजा परंपरा 7 जुलैच्या सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे. रथयात्रेची तारीख बदलता येणार नसल्यामुळे सकाळी सुरू होणारी रथयात्रा संध्याकाळी सुरू होईल. जगन्नाथ पुरीतील रथयात्रा दोन दिवस चालण्याचा योग 53 वर्षांनंतर येत आहे. यापूर्वी 1971 मध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगतज्ञांनी दिली. भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेचे सर्व विधी सुरळीत आणि वेळेवर पार पाडण्यासाठी मंदिर प्रशासनाने या वषी भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या बंधू-भगिनींचे नवजौबन दर्शन होणार नाही असा निर्णय घेतला आहे.

Advertisement

तीन किमी रथयात्रा

दरवषी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भगवान जगन्नाथ आपला भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह रथावर स्वार होऊन मुख्य मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात जातात. या मंदिरात पुढील 7 दिवस भगवान मुक्काम करतात. आठव्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला तीनही रथ मुख्य मंदिरात परततात. देवाच्या मंदिराकडे परतीच्या प्रवासाला यात्रा म्हणतात.

राज्यात दोन दिवस सरकारी सुट्टी

दोन दिवसांच्या रथयात्रेमुळे ओडिशा सरकारनेही दोन दिवस सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. पुरी येथे बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी 8 जुलै रोजीही सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली.

Advertisement
Tags :

.