चुकीची माहिती पाठविण्यापूर्वी ट्विटरवर मिळणार चेतावणी
12:08 AM Feb 07, 2020 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / नवी दिल्ली:
Advertisement
ट्विटरवर लवकरच वैशिष्टय़पूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहे. यात कोणतीही दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती ट्विट करण्यापूर्वी त्या ट्विटला बदलण्याची सूचना वापरकर्त्याला मिळणार आहे. ही सुविधा कंपनी 5 मार्च 2020 पासून सुरू करणार आहे. जनतेची दिशाभूल करणाऱया किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासह संरक्षण देणे हा यामागचा कंपनीचा मुख्य हेतू आहे.
Advertisement
लवकरच कंपनी आपल्या व्यासपीठावर ट्विटची लेबलिंग करणार आहे. यात दिशाभूल आणि चुकीच्या माहितीची ओळख पटविण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकांना चुकीच्या सूचना देण्याऱया ट्विटला हटविण्याचेही पाऊल उचलले जाणार आहे. त्याशिवाय नव्याने केलेल्या नियमांनुसार आम्ही ट्विटरवर अशा प्रकारच्या ट्विटची मर्यादाही कमी करणार आहोत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Advertisement
Next Article