चीनमधील वाहन विक्री मार्चमध्ये 48.4 टक्क्मयांनी घसरली
बीजिंग :
सध्या साऱया जगावरच कोरोनाचे संकट दिवसागणिक गडद
होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जगात ज्या चीनमधून कोरोनाचा प्रारंभ झाला, वुहान
शहर वगळता अन्य ठिकाणी शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले नव्हते. परंतु चीनमधील उद्योगधंद्याला
याचा फटका काही प्रमाणात का असेना बसला आहेच. चीनमध्ये वाहन विक्री मार्चमध्ये वार्षिक
तुलनेत 48.4 टक्क्मयांनी घसरली आहे. चीन देशाला जागतिक पातळीवरील सर्वात मोठी बाजारपेठ
म्हणून ओळखले जाते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे ही स्थिती बिकट झाली आहे. असे चीनचे
वाहन पुनर्निमाता संघ चायना असोसिएशन ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स यांनी सांगितले आहे.
विक्रीत एसयूव्ही, सेडान आणि मिनी व्हॅनसह अन्य सर्व प्रकारातील वाहन विक्री जवळपास
10 लाखाच्या घरात पोहोचली आहे. तर यात ट्रक आणि बस यांची मोजणी केल्यास ही एकूण वाहनांची
विक्री 43.3 टक्क्मयांनी घटून 14 लाखांवर राहिल्याचे चीनच्या वाहन पुनर्निमिती संघाने
स्पष्ट केले आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे ही विक्रीतील घसरणही सकारात्मक पाहिली जात
आहे.