महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चिनी विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवा

06:45 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चीनकडून अमेरिकेला सूचना : विमानतळांवर कठोर तपासणी होत असल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ व्हिएन्ना

Advertisement

चिनी विद्यार्थ्यांना त्रास देणे बंद करा असे चीनने अमेरिकेला सांगितले आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दोन्ही देशांचे नेते-अधिकाऱ्यांची भेट झाली आहे. यादरम्यान चीनचे पब्लिक सिक्युरिटी मिनिस्टर वांग शियाओहोंग यांनी अमेरिकेचे होमलँड सेक्रेटरी एलेजांद्रो मयोरकास यांना ही सूचना केली आहे. अमेरिकेच्या विमानतळांवर कागदपत्रं असूनही चिनी विद्यार्थ्यांची कठोर चौकशी केली जाते. अनेकदा तर या विद्यार्थ्यांना चीनमध्ये परत पाठविण्यात येते, विनाकारण अशाप्रकारची कठोर भूमिका घेणे योग्य नसल्याचे चीनकडून म्हटले गेले आहे.

अमेरिकेने आमच्या विद्यार्थ्यांना त्रास देणे बंद करावे. तसेच चिनी नागरिक-विद्यार्थ्यांना कुठल्याही भेदभावाशिवाय आणि सन्मानासह प्रवेश मिळेल हे निश्चित करावे अशी मागणी चीनच्या मंत्र्याने केली आहे.

मागील काही काळात चिनी नागरिकांनी अमेरिकेत पर्यटक म्हणून येत हेरगिरी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये अमेरिकेने चीनचा एक स्पाय बलून पाडविला होता. चीनचे नागरिक अमेरिकेत गोपनीय माहिती मिळवून ती चीनला पुरवत असल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.

चीनमुळे अमेरिकेत ड्रग समस्या

अमेरिका चीनमधून औषधांची आयात करतो. चीनमधून आयात होणाऱ्या औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात फेंटानिल असते. फेंटानिलयुक्त औषधांमुळे अमेरिकेत अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला बळ मिळत असल्याचा आरोप अमेरिकेने चीनवर केला होता.  अमेरिकेत फेंटानिलयुक्त औषधांच्या सेवनामुळे प्रतिवर्ष 70 हजार लोकांचा मृत्यू होत आहे.

चीनला मानतो शत्रू

अमेरिका चीनला स्वत:चा माठा शत्रू आणि जागतिक राजकारणातील सर्वात मोठे आव्हान मानतो. चीनसोबत युद्ध न करता संबंध सुधारण्याची इच्छा अमेरिकेकडून व्यक्त केली जाते, परंतु प्रत्यक्षात याचा अर्थ चीनने अपमान किंवा हल्ला झाल्यावरही प्रत्युत्तर न देणे असा असतो. हे आम्हाला मान्य नाही. अमेरिकेने अशाप्रकारचे वर्तन रोखले नाही तर कुठलेही वक्तव्य स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखू शकणार नसल्याचे चीनच्या विदेश मंत्र्यांनी मागील वर्षी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article