चिनी कंपन्यांची विक्रीत मजल
2020 मध्ये टाकला होता बहिष्कार : गेल्या काही दिवसात चीनी कंपन्यांची कमाई तेजीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारत आणि चीन यांच्यामध्ये 2020 मध्ये झालेल्या सीमा संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापाराची गती संथ राहिली होती. मात्र चिनी मालास गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा अच्छे दिन आले असल्याचे दिसून येत असून देशातील चिनी कंपन्यांची विक्री तेजीत राहिल्याचे उपलब्ध माहितीमधून समोर येत आहे.
देशात तीन सर्वात मोठय़ा चिनी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या असून यात शाओमी, लेनोवा आणि विवो यांच्या मोबाईल विक्रीवर म्हणावा तसा कोणताही प्रभाव पडलेला नाही. ज्यामध्ये दोन्ही देशांमधील 2020 मधील सीमा संघर्षानंतर विशेष करुन चिनी कंपन्यांच्या साहित्य खरेदीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. मात्र याच कंपन्यांनी रजिस्टर ऑफ कंपनीज यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉम्प्युटर निर्मिती करणारी कंपनी लेनोवोची विक्री 2020-21 मध्ये भारतामध्ये वेगाने वाढली आहे.
प्रमुख कंपन्यांची कामगिरी
साधारणपणे स्मार्टफोन निर्मिती शाओमी आणि विवोची विक्री काही प्रमाणात घसरली आहे. लेनोवो यांनी डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी ऍण्ड प्रमोशन(डिपीआयआयटी) थेट सरकारी टेंडर्समध्ये सहभाग घेण्यासाठी मंजुरी मिळाली नसल्यानेही आपला व्यवसाय वाढविला असल्याचे दिसून आले.
शाओमीचा महसूल
रजिस्टर ऑफ कंपनीज फायलिंगच्या माहितीनुसार देशाची सर्वात मोठी स्मार्टफोन निर्मिती शाओमी टेक्नॉलॉजी इंडियाने मार्च 2021 मध्ये समाप्त झालेल्या वर्षामध्ये 6 टक्क्यांच्या घसरणीसोबत 35,504 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता.
लेनोवाची कमाई वधारली
लेनोवा इंडियाचा एकूण नफा हा आर्थिक वर्ष 2021 मध्ये 14 टक्क्यांनी वधारुन 10,389 कोटी रुपयांवर राहिला. यामध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक खरेदी निविदेमध्ये थेट सहभाग घेता येत नव्हता कारण डिपीआयआयटीकडून मंजुरी मिळाली नव्हती.
विवोने कमविला 552 कोटीचा नफा
आर्थिक वर्ष 2021 मध्ये विवो कंपनीने 552 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये 348 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची नोंद केली होती.
गलवान येथे चीन भारत सैन्यात झटापट
गलवान येथे भारत आणि चीन यांच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला होता तेव्हा भारताकडून जुलै 2020 मध्ये सार्वजनिक खरेदीसाठीचे नियम बदलले होते. याचा प्रभाव चीनी कंपन्यांच्या व्यापारावर झाल्याचे दिसून आले होते.