महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चार पानी नोंदवला जबाब... 62 पानांचे पुरावेही सादर

06:22 AM Nov 12, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisement

महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री ऍड. अनिल परब यांचे दापोलीतील बेकायदेशीर साई रिसॉर्ट प्रकरण तडीस नेण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या जणू xईरेस पेटले आहेत. या रिसॉर्टप्रकरणात सोमय्या यांचा शुक्रवारी 10 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी पोलिसांनी आपला चार पानी जबाब नोंदवून घेतला. 62 पानांचे पुरावेही त्यांनी पुन्हा पोलिसांना सादर केले आहेत. प्रक्रिया पूर्ण होताच ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर ज्या दिवशी साई रिसॉर्ट तोडले जाईल, त्या दिवशी आपण स्वतः दापोली येथे हजर राहणार असल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement

 भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी रत्नागिरी पोलिसांना जबाब नोंदवून झाल्यानंतर येथील भाजपा जिल्हा कार्यालयात पत्रकार घेतली. त्यांनी सांगितले की, ऍड. अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी पोलीस कायदेशीर प्रक्रिया करत आहेत. पण दुसऱया बाजूला साई रिसॉर्ट तोडण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे सांगितले. ऍड. परब पालकमंत्री असताना त्यांनी अधिकाराचा वापर करून दापोलीत बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारले. कोरोनात 100 टक्के लॉकडाऊन असतानाही हा रिसॉर्ट बांधण्यात आला. पण या रिसॉर्टच्या खरेदी-विक्री प्रकरणातील पैसे दिल्याचा तपशीलही ऍड. अनिल परब यांनी का लपवला आहे? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.

  या बेकायदशीर प्रकरणात आपण आवाज उठवल्यानंतर रिसॉर्ट सदानंद कदम यांना विक्री केल्याचे दाखवण्यात आल्याचे समोर आले. खरेदीखतात सर्व तपशील नमूद नाहीत. तरीही उपनिबंधकांनी तो नोंदवून कसा घेतल्याचा आक्षेप सोमय्या यांनी नोंदवला आहे. ज्या अर्थी चुकीचे खरेदीखत नोंदवून घेतले गेले, याचा अर्थ अधिकारी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत होते, हे स्पष्ट झाले आहे. खोटे कागदपत्रे जोडून जागा बिनशेती करण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱयांच्या मदतीने हा घोटाळा करण्यात आला आहे. त्यामुळे खोटा दस्तऐवज देऊन बिनशेती केल्याचा गुन्हा अनिल परब यांच्याविरोधात दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. या प्रकरणात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  दापोलीतील बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारण्यात ऍड. परब यांना अधिकाऱयांचीही साथ लाभली आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱयांनी या प्रकरणात परब यांना हात दिलाय, त्या सर्व दोषी अधिकाऱयांवर कारवाईसाठी आपण आग्रही राहणार आहोत. बेकायदेशीर प्रकरणातील एकालाही आपण मोकळीक देणार नसल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. साई रिसॉर्ट तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निविदा मागवल्या असून त्या निविदा उघडून लवकरच ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. पण या प्रकियेसाठी 15 दिवसांचा अवधी जाणार आहे. या कारवाईसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यानंतर साई रिसॉर्ट तोडण्याच्या कामाला सुरूवात होईल व त्या दिवशी दापोली येथे आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला भाजपाचे येथील तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, प्रसिध्दीप्रमुख उमेश कुळकर्णी हे देखील उपस्थित होते.

आव्हाडांसारख्या माफियागिरी करणाऱयावर अशीच कारवाई होणार

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या कारवाईवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही आपली प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत मांडली. आव्हाड यांच्यावरील कारवाई योग्यच आहे. मागील उध्दव ठाकरे सरकारमध्ये आव्हाड यांना वाचवलेच नाही तर अटकेपासूनही संरक्षण दिले होते. पण आता माफियांचे सरकार गेले असून शिंदे-फडणवीसांचे सरकार आले आहे. त्यामुळे चुकीचे काम करणाऱया कोणालाही या सरकारकडून पाठीशी घातले जाणार नाही. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ज्यांना मारहाण केली आहे, त्या विषयातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी करणार असल्याचे सांगितले.

Advertisement
Next Article