महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चार दिवसांच्या तेजीला अखेर ब्रेक

08:58 PM Feb 07, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 164 अंकानी घसला : निफ्टी 12,098.35 वर बंद

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी मागील चार दिवसांच्या सत्रातील तेजीच्या कामगिरीला ब्रेक लागला आहे. जगभरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या
प्रभावामुळे आशियाई बाजारात नरमाईचे वातावरण राहिले होते. त्यामुळे त्याचे नाकारत्मक पडसाद शुक्रवारी मुंबई शेअर बाजारातील घडामोडीवर पडले आहेत. यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 164.18 अंकानी घसरुन निर्देशांक 41,141.85 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 39.60 अंकानी घसरुन निर्देशांक 12,098.35 वर बंद झाला आहे.

दिवसभरातील व्यवहारात दिग्गज पंपन्यांमध्ये इंडसइंड बँक , महिंद्रा ऍण्ड महिंद्रा , रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि भारती एअरटेल यांचे समभाग सर्वाधिक घसरणीसह बंद झाले आहेत. दुसरीकडे एनटीपीसी, ओएनजीसी, ऍक्सिस बँक , एचसीएल टेक आणि हिरो मोटोकॉर्प यांचे समभाग मात्र तेजीत राहिले होते.

प्रमुख क्षेत्रांची कामगिरी

विविध क्षेत्रांच्या कामगिरीमध्ये आठवडय़ातील शेवटच्या दिवशी रियल्टी, वाहन आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांचा निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. हेल्थकेअर आणि कन्झुमर डय़ूरेबल्स याचे निर्देशांकांनी तेजीची नोंद करत बंद झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  

धास्ती कोरोनाची

सध्या जगभरातील विविध देश कोरोना या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे भीतीच्या छायेखाली वावरत आहे. यामुळे जगामधील प्रमुख व्यापार, उद्योग, वाहनासह अन्य क्षेत्रातील उत्पादनांचे प्रकल्प बंद करण्याचा निर्णय कंपन्यांकडून घेण्यात येत आहे. नुकतीच या संदर्भात संसर्ग झालेल्या नागरिकांपैकी जवळपास  636 जण आतापर्यंत मृत्यमुखी पडले आहेत. तर हजारोजणांना या विषाणुच्या संसर्ग झाल्याने ते उपचार घेत आहेत. परंतु अजून ठोस अशी लस या विषाणूला रोखण्यास तयार झाली नसल्यामुळे या रोगाची धास्ती जगभरात पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे डॉक्टारांनी म्हटले आहे. 

Advertisement
Tags :
#business#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article