चढउताराच्या प्रवासात सेन्सेक्स प्रभावीत
सेन्सेक्स 105 अंकांनी घसरला : मुख्य बँकां नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात पुन्हा नकारात्मक वातावरण राहिले असून चढउताराच्या प्रवासात बीएसई सेन्सेक्स 105 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. सदरची घसरण हि सलग दुसऱया दिवशी कायम राहिली असल्याने बाजार नुकसानीसह बंद झाले आहेत.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 700 अंकांपेक्षा अधिकने चढउतार राहिला होता. अंतिम क्षणी 104.67 अंकांनी घसरुन 57,892.01 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17.60 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,304.60 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमधील घसरणीत प्रामुख्याने आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक आणि इंडसइंड बँक यांच्यासह अन्य बँकांच्या समभागात विक्री झाल्याने ते नुकसानीसह बंद झाले आहेत. सेन्सेक्समधील 30 समभागात 19 समभाग घसरुन बंद झाले आहेत. दुसऱया समभागात एचडीएफसी आणि आरआयएलचे समभाग 1.71 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
जगभरातील अन्य बाजारातील स्थिती
जगभरातील विविध बाजारांमध्ये अमेरिकन शेअर बाजारात वॉलस्ट्रीटमध्ये तेजी राहिल्याने आशियातील अन्य बाजारात तेजी राहिली होती. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने दिलेल्या संकेतामध्ये बँक निर्णायक निर्णय घेण्यास तयार आहे, परंतु त्यांनी व्याजदरात वाढ करण्याची स्पष्ट शक्यता कोणत्याही प्रकारे व्यक्त केली नसल्याचे दिसून आले आहे. याच गोष्टीचा परिणाम भारतीय बाजारात झाला असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
विदेशी गुंतवणूक
जागतिक बाजारातील कच्चे तेल मानक ब्रेंट क्रूड वायदा 0.86 टक्क्यांनी घटून 93.99 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थाकडून बुधवारी 1,890.96 कोटी रुपयाच्या मूल्याचे समभाग विक्री केली आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एचडीएफसी..... 2410
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2444
- हिंदुस्थान युनि.. 2307
- पॉवरग्रिड कॉर्प.... 197
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1866
- टायटन............ 2493
- एशियन पेन्ट्स.. 3265
- टेक महिंद्रा....... 1446
- बजाज फायनान्स 7084
- विप्रो................. 564
- आयटीसी........... 222
- ओएनजीसी........ 171
- मॅरिको............... 507
- आयशर मोर्ट्स... 2722
- टाटा मोर्ट्स........ 500
- गेल................... 139
- जेएसडब्लू स्टील.. 637
समभाग घसरलेल्या कंपन्या
- आयसीआयसीआय 750
- अल्ट्राटेक सिमेंट. 7048
- ऍक्सिस बँक........ 782
- इंडसइंड बँक....... 955
- नेस्ले................ 3784
- टीसीएस.......... 3784
- सन फार्मा.......... 862
- स्टेट बँक............. 512
- एचडीएफसी बँक 1506
- बजाज फिनसर्व्ह 16178
- भारती एअरटेल... 717
- डॉ.रेड्डीज लॅब.... 4300
- एचसीएल टेक... 1164
- इन्फोसिस........ 1725
- मारुती सुझुकी... 8550
- एनटीपीसी......... 132
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 861
- टाटा स्टील....... 1190
- अरोबिंदो फार्मा... 674
- डाबर इंडिया...... 554
- फेडरल बँक........... 98
- एसआरएफ....... 2430
- अशोक लेलँड....... 126
- ज्युबिलंट फूड 3027
- अदानी पोर्ट........ 734
- ल्यूपिन.............. 771
- अपोलो हॉस्पिटल 4550