For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घसरणीनंतर शेअरबाजारात तेजीची नोंद

08:46 PM Feb 03, 2020 IST | Tarun Bharat Portal
घसरणीनंतर शेअरबाजारात तेजीची नोंद
Advertisement

सेन्सेक्स 136.78 अंकांनी तर निफ्टीत 62.20 अंकांची वधार

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअरबाजारात सोमवारी तेजी नोंदविण्यात आली. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 136.78 अंकांच्या तेजीसह 39,872.31 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 62.20 अंकांनी वधारत 11,724.05 अंकांवर बंद झाला. यापूर्वी सलग तीन सत्रांत सेन्सेक्समध्ये सुमारे 1,463.13 अंकांची घसरण नोंदविण्यात आली होती.

Advertisement

सेन्सेक्समध्ये एशियन पेन्ट्समध्ये सर्वाधिक 6.30 टक्क्यांची तेजी होती. नेस्ले इंडिया 5.30 टक्के, हिंदुस्तान यूनिलिव्हर, बजाज ऑटो आणि इन्डसइन्ड बँकेचे समभाग 4 टक्क्यांपेक्षा अधिक तर भारती एअरटेल आणि टाटा स्टील तीन टक्क्यांपेक्षा अधिक वधारल्याचे पाहायला मिळाले. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 0.18 टक्क्यांची तेजी राहिली. दुसरीकडे आयटीसीमध्ये 5.09 टक्क्यांची घसरण होती. टीसीएस आणि एचसीएल टेकमध्ये 2 टक्क्यांपेक्षी अधिक घसरण होती.

मुंबई शेअरबाजारातील दोन वगळता सर्वच क्षेत्रात तेजी राहिली. कन्झुमर डिक्रीशनरी गुड्स अँड सर्विसेसमध्ये सर्वाधिक 1.86 टक्क्यांची तेजी होती. मुलभूत वस्तू, वाहन, धातू, विज आणि मालमत्ता यातही एक टक्क्यांपेक्षा अधिक तेजी राहिली.

सोमवारी सकाळी रुपया 32 पैशांच्या घसरणीसह डॉलरच्या तुलनेत 71.65 वर सुरू झाला. यानंतर शेअरबाजार चढ-उतारात होता. व्यापाराच्या सुरुवातीला 354 समभागात तेजी आणि 352 समभागात घसरण पाहायला मिळाली. माहिती तंत्रज्ञान, धातू आणि औषध निर्माता समभागाच्या व्यतिरिक्त सर्वच क्षेत्र घसरणीत होते. वधारलेल्या प्रमुख समभागात आयओसी, कोल इंडिया, एशियन पेन्ट्स, एचयुएल, बीपीसीएल, एलआयसी हौसिंग फायनान्स यांचा समावेश आहे. तर घसरणीमध्ये आयटीसी, एचडीएफसी, पॉवर ग्रीड आणि आरआयएल यांचा समावेश आहे. शनिवारी सेन्सेक्स 39,735.53 अंकांवर तर निफ्टी 11,661.85 अंकांवर बंद झाला होता.  

Advertisement
Tags :

.